‘या’ व्यक्तीमुळे लग्नानंतर हनिमूनला नाही जाऊ शकणार रणबीर आणि आलिया..!

बॉलिवुड मध्ये आजकाल रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाची चर्चा जोरदार सुरू आहे. मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार याच महिन्यात ही जोडी सात फेरे घेणार आहे. बातमी ही आहे की 14 एप्रिल पासून ते 21 एप्रिल दरम्यान या दोघांचे लग्न होणार आहे. तथापि, यावर अजून कोणतेही अधिकृत विधान समोर आले नाही आहे.

ई-टाइम्सच्या नुसार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यावेळेस आपल्या आगामी काळात येणाऱ्या प्रकल्पात व्यस्त आहेत म्हणून दोघ फक्त आपल्या लग्नासाठी वेळ काढतील. असे सांगितले जात आहे की दोघेही एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करणार आहेत, हा निर्णय दोघांच्याही चित्रीकरणाच्या सवडीने आणि पंडितांच्या काढलेल्या तारखेनुसार घेतलेला आहे.

आलिया आणि रणबीर दोघेही कामात एवढे व्यस्त आहेत की सध्या त्यांची हनिमूनला जाण्याची देखील काही योजना नाही आहे. रणबीर कपूरने आपल्या लग्नामुळे आपल्या चित्रीकरणाच्या तारखेमध्ये बदल देखील केला आहे. रणबीर एप्रिलच्या सुरुवातीला लव रंजनच्या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. यानंतर 7-8 दिवस थांबून संदीप रेड्डी वांगा यांचा चित्रपट ‘एनिमल’ साठी काम करणार.

मीडियाच्या माध्यमातून असे देखील सांगितले जात आहे की रणबीर 22 एप्रिल पासून ‘एनिमल’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. याअगोदर बातमी आली होती की रणबीर कपूर आपल्या कुटुंबासारखे जुन्या घरी येऊन लग्न करेल. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी देखील आपल्या घरी येऊन 1980 मध्ये लग्न केले होते. पाहुण्यांबद्दल बोलायचे झाले तर लग्नात एकूण 450 लोकं सामील होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *