‘या’ तरुण अभिनेत्याने सर्वांसमोर व्यक्त केली धकधक गर्ल माधुरीला बेडरूम मध्ये नेण्याची ईच्छा..

माधुरी दीक्षितने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले. प्रेक्षकांच्या या लाडक्या धकधक गर्लने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. दिल, दिल तो पागल है, हम आपके है कौन, बेटा, पुकार यांसारख्या अनेक चित्रपटात माधुरीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आणि तिच्या या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतल्या

80 च्या दशकात माधुरी दीक्षितची गणना इंडस्ट्रीच्या टॉप मॉडेलमध्ये होत होती. ‘तेजाब’ आणि ‘दिल’ यांसारखे ब्लॉकबस्टरस तिच्या नावावर होते. 1991 साली आलेल्या ‘साजन’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका केली होती. चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिटही ठरला. आणि माधुरीने बॉलीवूड मध्ये आपले वर्चस्व दाखवून दिले.

बॉलीवूड मधील अनेक पिढ्यामधील कलाकार आणि चाहते माधुरीसाठी अक्षरशः पागल झाले होते. केवळ भारतच नव्हे तर पाकिस्तानमधील प्रेक्षकांना सुद्धा माधुरीने वेड लावले होते.ज्यावेळी भारत-पाकिस्तान सीमेवर यु-द्ध-जन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्या वेळी पाकिस्तानचे सैन्य असे म्हणत असत की जर तुम्ही माधुरी दीक्षित ला पाकिस्तानच्या हवाली केले तर आम्ही यु-द्ध थांबवू.

सर्वसामान्य जनताच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आजही माधुरीसाठी वेडे आहेत .कॉफी विथ करण या करण जोहरच्या प्रसिद्ध चॅट शोमध्ये जॅकी श्रॉफ आला होता त्यावेळी त्यांनी सुद्धा माधुरी प्रतीचे आपले प्रेम व्यक्त केले होते. या व्यतिरिक्त तिच्या पिढीतील अनेक स्टार सोबत तिचे नाव सुद्धा जोडले गेले होते. त्यामध्ये अनिल कपूर ,संजय दत्त यांच्या नावांचा समावेश केला जातो.

या चित्रपटाच्या वेळी माधुरी आणि संजय दत्त यांच्यामधील जवळीक वाढली होती व त्या वेळी विवाहित असलेल्या संजय दत्तने आपल्या कुटुंबाची पर्वा न करता माधुरी विषयीचे प्रेम अगदी खुलेआमपणे व्यक्त केले होते . मात्र त्यानंतर हे प्रेम संबंध दीर्घकाळ टिकू शकले नाही. आजच्या काळातील अभिनेत्यांनासुद्धा माधुरी विषयी प्रचंड आकर्षण वाटते व आजही अनेक अभिनेते तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हासुद्धा माधुरी दीक्षित चा दिवाना आहे हे कॉफी विथ करण या कार्यक्रमातील भागामध्ये दिसून आले.कॉफी विथ करण मध्ये जुही चावला आणि माधुरी दीक्षित या दोघी आल्या होत्या. त्यावेळी करणने त्यांना चार वर्षांपूर्वीचा सिद्धार्थचा एक व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये त्याने माधुरी वरचे आपले प्रेम व्यक्त केले आहे.

यामध्ये तो म्हणतो की माधुरी दीक्षित वर त्याचे खूप प्रेम आहे व तिच्या नृत्याच्या अदा नेहमीच त्याच्या डोक्यामध्ये रेंगाळत असतात आणि ही तीच मुलगी आहे जिला तो आपल्या बेडरूम मध्ये नेऊ इच्छितो. त्याचे हे बोलणे ऐकून माधुरी दीक्षित सुद्धा हैराण झाली होती.व तिने सिद्धार्थ खरंच असे बोलला होता का असा प्रतिप्रश्न करणला केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *