अत्यंत हुशार अशी सारा अली खान तितकीच सुंदर आहे आणि तिने स्वत: ला इतके फिट केले आहे की तिची फिगर अप्रतिम आहे. सारा बर्याचदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत राहते, परंतु तिचे काही फोटो असेही आहेत की ज्यामुळे लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात करतात.
तिचा भाऊ इब्राहिम सोबत तिने काढलेले काही फोटोज हे लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. हे फोटो साराने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. त्यावर भरपूर चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात काही प्रतिक्रिया सकारात्मक असल्या तरी अनेकांनी ह्या फोटोजची टीका केली आहे.
सारा बहुतेक वेळेस सुट्टीच्या दिवशी कुटुंबासमवेत पूलवर छायाचित्रे घेते आणि तिचे हेच बिकिनी पिक्स लोकांना विचलीत करतात कारण त्यात इब्राहिम सोबतच्या तिच्या पोजेस अनेकदा आक्षेपार्ह असतात असं चाहत्यांचं म्हणणं आहे. भाऊ बहिणीच्या नात्याला शोभणारे हे फोटोज नाहीयेत असं मत अनेकांनी व्यक्त केलंय.
लोक सहसा उलट सुलट प्रतिक्रिया देतात की, आपल्या भावाबरोबर असे फोटोज काढणे चुकीचे आहे. कोणीतरी म्हणते की साराला कळत नाहीये की हा आपला भाऊ का प्रियकर आहे. काहींनी तर सरळ सरळ तिला अशे फोटोज डिलीट करण्याची मागणी केली आहे.
काही चाहत्यांचे म्हणणे आहे की भावाबरोबर अशी छायाचित्रे कोण घेते. काहीजणांनी हे धर्माशी जोडत आणि धर्माला उद्धृत करून साराला वाईट म्हणत आहेत. तथापि, असे बरेच लोक आहेत ज्यांना सारा आणि इब्राहिमचे हे बंधन खूप आवडते आणि ते साराच्या ट्रोलला उत्तर देत राहतात.
साराने ट्रोलर्सना उत्तर देण्यास नकार दिला आहे. तिचं म्हणणं आहे की लोकांनी काहीही विचार केला तरी त्याने त्यांच्या नात्यात बदल नाही होत. तिचे तिच्या परिवारावर खूप प्रेम आहे आणि राहील. लोकांच्या बोलण्याने तिला काहीही फरक पडत नाही. तिच्या परिवाराचा तिला कायमच पाठिंबा आहे.
सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे दोघेही सैफ अली खान आणि अमृता राव यांची अपत्ये आहेत.. साराने काही वर्षांपूर्वीच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. तसेच इब्राहिम खानही लवकरच चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करण्याच्या मार्गावर आहे.