ज्या लोकांमध्ये असतात ह्या वाईट सवयी, त्यांना शनिदेवांच्या क्रोधाला सामोरे जावे लागते.

शनिदेव लवकर क्रोधीत होणारे देव म्हणून ओळखले जातात आणि त्यांना न्यायाची देवता सुद्धा म्हंटले जाते. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात आणि असे म्हंटले जाते की शनिदेवांची कृपा सहजरित्या कोणावर होत नाही. पण जर शनिदेव कोणावर प्रसन्न झाले तर त्याचे जीवन धन-धान्याने समृद्ध होते.

शनिदेवांना कधी नाराज नाही केले पाहिजे. जर एकदा ते नाराज झाले तर तुम्ही कितीही चांगली कामे करा त्याचे इच्छित फळ तुम्हाला मिळत नाही. शनिदेव वाईट कामे करणाऱ्यांना वाईट व चांगली कामे करणाऱ्यांना चांगले फळ देतात. जर तुमच्यावर शनिदेव नाराज झाले तर तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळू शकतो.

आज आम्ही तुम्हाला अशा काही वाईट सवयीबद्दल सांगणार आहोत ज्या केल्याने शनिदेव क्रोधीत होतात. ज्या लोकांमध्ये ह्या ४ वाईट सवयी आहेत त्यांनी त्या लवकरात लवकर बदलायला हव्या.

१) देवाचा अपमान : काही लोकांना सवय असते की त्यांच्या आयुष्यात जेव्हा सगळं सुरळीत चालू असतं तेव्हा ते देवाची फार प्रशंसा करतात. पण जेव्हा त्यांच्या आयुष्यात काही विपरीत घडतं जे त्यांच्या मनाविरुद्ध असत तेव्हा ते देवाला दोष देणे सुरू करतात. शनिदेवांना अशा स्वभावाचे लोक आवडत नाही आणि त्यांच्यावर ते कधीच प्रसन्न होत नाही.

२) शनिवारी दिवा न लावणे : तसे तर रोजच देवाची पूजा करणे आणि त्यांना दिवा उदबत्ती करणे चांगले असते. पण जो व्यक्ती शनिवारी घरात किंवा मंदिरात तेलाचा दिवा लावत नाही , त्या व्यक्तीवर शनिदेव कधीच प्रसन्न होत नाही. ते त्या व्यक्तीवरून त्यांची दृष्टी काढून घेतात. त्यामुळे प्रत्येक शनिवारी कमीत कमी एकेवेळतरी तेलाचा दिवा जरुर लावावा.

३) चामड्याच्या वस्तू घालुन पूजा करणे: जेव्हा आपण शनिदेवाची पूजा करत असतो तेव्हा आपल्या अंगावर चामड्यापासून बनलेल्या वस्तू उदा. बेल्ट, लेदर जॅकेट, पर्स इत्यादी ठेवू नये. शनिदेवांना चामडे पसंत नाही. तुम्ही तुमच्या घरात पूजा करत असाल तर अशावेळी चामड्याच्या वस्तू त्यांच्या जवळ नेऊ नये.

४) कावळ्याला दगड मारणे : बऱ्याच वेळा जेव्हा कावळा आपल्या घरावर किंवा अंगणात येतो तेव्हा बरेच लोक त्याला दगड मारून हाकलून लावतात. तुम्हाला सांगू इच्छितो की असे करणारे व्यक्ती शनिदेवांना आवडत नाही कारण कावळा शनिदेवचे वाहन आहे आणि त्याला दगड मारणे म्हणजे खुद्द शनिदेवांचा अपमान करणे. असे करणाऱ्याच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *