‘या’ भारतीय क्रिकेटपटू वर फिदा झाल्या होत्या बॉलिवूड मधील 7 अभिनेत्रीज्, एक तर करणार होती लग्न, पण…..

‘या’ भारतीय क्रिकेटपटू वर फिदा झाल्या होत्या बॉलिवूड मधील 7 अभिनेत्रीज्, एक तर करणार होती लग्न, पण…..
बॉलिवूड आणि क्रिकेटमधील नातं तसं पाहिलं तर खूप जुन आहे. असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत सात जन्माची गाठ बांधली आहे. यात सध्याचा कर्णधार विराट कोहली, माजी वेगवान गोलंदाज झहीर खान, फिरकीपटू हरभजन सिंग आणि माजी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदी यांचा समावेश आहे. या सर्व क्रिकेटर्सनी बॉलिवूड स्टार्सना डेट केले आणि लग्नही केले.

त्याच वेळी, एक असा क्रिकेटर आहे ज्याने बॉलिवूडच्या अनेक बड्या अभिनेत्रींना डेट केले आहे पण कधीच कुणाशी लग्न केले नाही. आज आम्ही तुम्हाला त्या क्रिकेटरविषयी सांगणार आहोत ज्याने प्रीती झिंटा ते मिनीशा लांबा पर्यंत अभिनेत्रींना डेट केले आहे. वास्तविक आम्ही भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगबद्दल बोलत आहोत. ज्याने अनेक अभिनेत्रींना वेड केले. युवराज सिंग याने सर्वात जास्त म्हणजे 7 बॉलिवूड अभिनेत्री सोबत आपले नाते जोडले. चला तर मग जाणून घेऊया, त्या 7 अभिनेत्री कोण आहेत…

किम शर्मा- अभिनेत्री किम शर्माने क्रिकेटर युवराजसिंगला बर्‍याच दिवसांपर्यंत डेट केले. हे कपल त्यांच्या रिलेशनशिपमुळे बर्‍याचदा चर्चेत राहते. दोघांनी एकमेकांना 4 वर्षे डेट केलं आणि नंतर ते वेगळे झाले. असे म्हणतात की किम शर्मा स्वभाव खूप अब्युजीव होता, त्यामुळे दोघांचे ब्रे क अप झाले. तथापि, आता हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि आजही एकमेकांशी संवाद साधतात.

दीपिका पदुकोण– दीपिका पादुकोण आणि युवराजसिंगचे प्रेम प्रकरण बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वात सर्वाधिक चर्चेत होते. त्या दिवसांत बऱ्याच सामन्यांमध्ये युवराजला चीअर करण्यासाठी दीपिका स्टेडियमवर पोचत असे आणि सामन्यानंतर दोघेही डिनर करताना दिसले. त्या दिवसांत दीपिका पादुकोण बॉलिवूडमध्ये नवीन होती आणि युवराज सिंग क्रिकेट विश्वात खूप प्रसिद्ध होते. परंतु, या नात्यालाही मंजिल मिळाली नाही आणि लवकरच ह्या दोघांचे ब्रे क अप झाले. बातमीनुसार युवराज दीपिकाबद्दल खूप पजेसीव होता, ज्यामुळे दोघांचे ब्रे क अप झाले.

नेहा धुपिया- बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियानेही युवराजसिंगला डेट केलेली आहे. यांच्या या प्रेम प्रकरणामुळे बर्‍याचदा ते चर्चेत आले होते. होय, त्या दिवसांत त्यांच्या प्रेमाची चर्चा चारही दिशेला होती. दोघेही बऱ्याच मोठ्या फंक्शन्स आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले होते. नेहा आणि युवराज या दोघांनी कधीही माध्यमांसमोर या नात्याची कबुली दिली नाही आणि नंतर त्यांच्या प्रेमाच्या बातम्याही ठप्प झाल्या.

रिया सेन- अष्टपैलू युवराजचे नाव रिया सेनशीही जोडले गेले. आम्ही तुम्हाला सांगतो की रिया हे अभिनय जगतात एक मोठे नाव आहे. त्या दोघांनाही डेट ला जाताना मिडिया कॅमेर्‍यात स्पॉट केले होते. इतकेच नाही तर दोघांना बर्‍याच पार्टीत एकत्रही पाहिले गेले होते.

मनीषा लांबा- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मिनीषा लांबा यांचेही युवराज सिंगसोबत रिलेशनशिप होते. एक वेळ असा होता की दोघे एकमेकांना डेट करायचे. त्या दिवसांत दोघांच्या प्रेमा बद्दल खूप चर्चा झाली होती.

प्रीती झिंटा- बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणजेच प्रीती झिंटा आणि युवराजच्या प्रेमाच्या कथा कोणाकडूनही लपलेल्या नाहीत. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. लक्षात घ्या की जेव्हा किंग्ज इलेवन पंजाब कडून युवराजसिंग खेळायचे तेव्हा त्या दिवसात टीमची मालकीण प्रीती आणि युवी यांच्यात बरीच जवळीक झाली होती. प्रीती झिंटा आणि युवराज सिंग अनेक वेळा एकत्र दिसले. अशी अफवा होती की दोघांनीही लग्न केले होते, पण त्यांचे नातेही ब्रे क अपमुळे संपले. मात्र, युवराज आणि प्रीतीने हे नातं कधीच स्वीकारलं नाही.

अनेक अभिनेत्रीं सोबत नाव जोडल्यानंतर 2016 मध्ये युवराज सिंग ने हेझल कीचबरोबर सात फेरे घेतले. युवराज सिंगने एका मुलाखतीत सांगितले होते की, हेजलला प्रभावित करण्यासाठी त्याने अनेक वर्षे कष्ट घेतले. तथापि, आता दोघेही त्यांच्या विवाहित जीवनातून खूप आनंदी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *