बॉलिवुड ची प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना ने आपल्या अंदाजाने बॉलिवुड मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बरसात’ चित्रपटापासून हिंदी चित्रपटात पाऊल ठेवणाऱ्या ट्विंकल खन्नाचा शेवटचा चित्रपट ‘लव के लिये कुच भी करेगा’ हा होता. अक्षयकुमार सोबत लग्नानंतर ट्विंकल खन्ना ने बॉलिवूड ला अलविदा केले.
ट्विंकल खन्ना च्या आयुष्यात काही व्यक्ती असे देखील आहेत जे तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होते. ते दुसरं तिसरं कोणी नसुन बॉलीवुड मधील प्रसिद्ध निर्माते करण जोहर होते. ज्यांचे की अभिनेत्री ट्विंकल खन्नावर प्रेम झाले होते. यासंबंधीत खुलासा स्वतः ट्विंकल खन्नाने केला होता.
‘मिसेस फनीबोन्स’ पुस्तकाच्या प्रदर्शनादरम्यान या गोष्टीबद्दल खुलासा केला गेला होता. अभिनेत्रीने सांगितले की करण जोहरचे प्रेम माझ्या मिशांवर आले होते. ट्विंकल खन्नाने याबद्दल सांगितले की करणने मला त्याच्या मनातली गोष्ट देखील सांगितली होती की ते माझ्यावर प्रेम करतात.
त्यावेळेस मला जरा हलक्या हलक्या मिश्या असायच्या. करण जोहर बद्दल सांगताना ट्विंकल पुढे म्हणते की, करण नेहमी माझ्या मिशांचे कौतुक करत असायचे. मात्र, ट्विंकल खन्ना नाही तर करण जोहर यांनी देखील याबद्दल खुलासा केला आणि म्हणाले होते की, ट्विंकल ही एकमात्र अशी महिला होती जिच्यावर माझे प्रेम झाले होते.