हिंदी सिनेमा जगतचे स्टार नेहमीच आपल्या बातम्यांमुळे चर्चेत असतात. ही मायानगरीच प्रत्येक माणसाचे भविष्य बनवते आणि बिघडवते सुद्धा. बॉलीवूडचे बरेच असे सेलेब्स आहेत ज्यांनी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचून खस्ता खाल्ल्या आहेत. ज्यानंतर ते इंडस्ट्रीमधून त्याचे नाव आणि काम कायमचे बाहेर गेले.
अशीच एक अभिनेत्री जिने फक्त एक सिनेमाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावलं, पण नशिबाचे ग्रह असे फिरले की आज ती चित्रपटसृष्टीतुन गायब आहे. आम्ही बोलत आहोत आशिकी ने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनु अग्रवाल.
अनु अग्रवाल तिच्या सौंदर्यासाठी खूप फेमस होती. अनुने अवघ्या वयाच्या २१ वर्षी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. सांगितले जाते की , फिल्म निर्माता महेश भट्ट ने अनु ला पहिला ब्रेक दिला होता. महेश भट्ट च्या नजरेत अनु येताचक्षणी लगेचच त्याने तिला फिल्म आशिकी साठी निवडले. सिनेमा प्रदर्शित होताच तिने सौंदऱ्यामुळे प्रेक्षकांची मने जिंकली.
अनु अग्रवाल ने आशिकी नंतर ‘किंग अंकल’, ‘कन्यादान’ , ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’ सारख्या साऊथ चित्रपटात कामे केली. तिने थिरुदा-थिरुदा मध्येही काम केले.अनु ला जेव्हा वाटले की तिचे करीयर डूबत चालले आहे तेव्हा तिने शॉर्ट फिल्म सुद्धा केली जिचं नाव ‘ द क्लाऊड डोर’ होतं.
पण म्हणतात ना की नशीब आणि वेळ खराब आली की त्यावर कोणाचेच चालत नाही. वेळेसोबत तिचे स्टारडम संपुष्टात आले आणि १९९६ साली सिनेमा सोडला आणि योग कडे आपले लक्ष वळवले. अनु अग्रवाल आपल्या करियरच्या संघर्षात होती, तेव्हा १९९९ साली एक घटना घडली ज्यामुळे तिचे जीवनच बदलून गेले. अभिनेत्रीचा एक भयानक अपघा त झाला.
ह्या अपघातामुळे ती २९ दिवस को मा मध्ये होती. ह्या अपघातामुळे तिचे चालणे-फिरणे बंद झाले आणि समरणशक्तीवर सुद्धा परिणाम झाला. तिच्यावर ३ वर्षे उपचार चालला. जेव्हा ती बरी झाली तेव्हा तिने सर्व संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः संन्यास घेतला, ज्यानंतर ती पुर्णपणे गायब झाली.
बऱ्याच वर्षानंतर तिचा एक फोटो समोर आला ज्यामुळे ती पुन्हा बातम्यांवर झळकली. ह्या फोटोत ती फार वाईट अवस्थेत असल्याचे दिसली. २०१५ साली अनु आपली आत्मकथा ‘ अनयूजवल : मेमरी ऑफ ए गर्ल हु केम बॅक फ्रॉम डे ड’ मुळे चर्चेत राहिली. जीवनाच्या ह्या प्रवासात अनुने वेगवेगळे दिवस बघितले आणि आता अनु बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात एकटी राहते आणि इतरांना योग शिकवते.