वास्तविक असे म्हटले जाते की कॅटरिना कैफ आणि विकी कौशल हे एकमेकांसोबत बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. तथापि, यापैकी कोणतीही गोष्ट अद्याप दोघांनी स्वीकारली नाहीये. आता असेेेही म्हटले जात आहे की हे दोघेही या नात्याला पुढे नेण्याचा विचार करत आहेत आणि या वर्षाच्या अखेरीस ते दोघेही लग्नाचा बंधनात गुंततील.
त्याचवेळी अशी एक बातमी आली जीने सर्वांनाच धक्का दिला आहे. वास्तविक, असे म्हटले जात आहे की या दोघांनीही गुपचूप पद्धतीने सगाई केेली आहे. त्यांच्या रोका सोहळ्याची बातमी सोशल मीडियावर पोहोचताच लोकांनी त्यावर चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. काही लोकांनी तर कॅटरिना आणि विकी कौशल यांना अभिनंदनाचे संदेशही दिले आहेत.
खरं तर, एका प्रसिद्ध इन्स्टाग्राम पापाराझीने याची पुष्टी केली आणि सांगितले की विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांनी एकमेकांसोबत अंगठी बदलून त्यांच्या नात्याला नवीन नाव दिले आहे. व्हायरल भयानी या इंस्टाग्राम अकाऊंटवर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रोका सेरेमनीचा एक फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये, लिहिले होते की सगाईची अफवा… पण काही काळानंतर ही पोस्ट डिलीट केली गेली.
आता सत्य काय आहे हे कोणालाच माहीत नाहीये, दोघांनी सगाई केली आहे किंवा ती फक्त एक अफवा आहे, हे अधिकृत पुष्टीकरणानंतरच कळेल. एका पुरस्कार सोहळा दरम्यान हे नाते लोकांच्या नजरेत आले होते, पुरस्कार सोहळा दरम्यान विकी कौशलने कबूल केले होते की कतरिना कैफ ही त्याची क्रश आहे.