कॅटरीना कैफ जिथे ‘टायगर 3’ चित्रपटाच्या चित्रीकरणातून मुक्त झाली आहे तसेच विकी कौशल देखील काही कामातून वेळ काढून लगेच दोघं फिरायला गेले आहेत. मुंबईच्या बाहेर जाऊन त्यांनी सुट्ट्या घालवण्याची योजना केली आहे.
सध्यातरी दोघेही आपल्या सुट्ट्यांचा पूर्णपणे आनंद घेत आहेत आणि त्यांच्या या शानदार आनंदाचे क्षण देखील सोशल मीडियावर आपल्या बघायला मिळत आहेत. विकी ने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही खास क्षण दाखवले आहेत.
त्यात विकी ने एका सुंदर अशा सनसेट चा फोटो देखील शेयर केला आहे ज्यामध्ये खूप लांब पर्यंत पसरलेला अथांग समुद्र दिसत आहे. या फोटोमधून एक गोष्ट तर स्पष्ट आहे विकी आणि कॅटरिना समुद्रकिनारी आपल्या सुट्ट्या घालवत आहेत. तथापि ना विकी ने व कॅटरीना ने त्यांच्या जागेबद्दल काही सांगितले आहे.
तथापि, मीडिया रिपोर्ट्स नुसार दोघेही सिंगापूर ला आपल्या सुट्ट्या घालवण्यासाठी गेले आहेत. या दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे झाले तर कॅटरीनाच्या ‘टायगर 3’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. तर विकी देखील लवकर नवीन काही चित्रपटात दिसणार आहे.
विकी आणि कॅटरिना यांच्या मधुचंद्राचे फोटोज व्हायरल, समुद्रकिनारी दिसले करताना..
