सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे की जिथे एखाद्या सेलिब्रिटीचे काहीही झाले किंवा कोणतेही नवीन अपडेट आले की तीची माहिती तीच्या चाहत्यांपर्यंत आणि वापरकर्त्यांपर्यंत लगेच पोहोचते. भारतीय संघाचा क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यातील वादाच्या बातम्याही सोशल मीडियावर खूप चर्चेत होत्या.
उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्यातील वादामुळे उर्वशीची कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर येताच लोक तिच्यावर कमेंट करतात आणि प्रत्येक पोस्ट ऋषभ पंतशी जोडून तिला ट्रोल करतात. नुकताच उर्वशीने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी तीच्या पोस्टवर अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या ट्रेंडिंग गाण्यावर रील केले. या गाण्यात ती तिची स्टाइल दाखवताना दिसत आहे. या रील दरम्यान, तिने पिवळ्या रंगाचा एक अतिशय सुंदर सूट परिधान केला होता आणि त्यामध्ये ती अप्रतिम दिसत होती. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर ‘भीगा भीगा है समान, ऐसे में है तू कहाँ’ हे गाणे वाजत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीने कॅप्शनही शेअर केले आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी कमेंट करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर एका यूजरने एक मजेदार कमेंट दाखवली, तो आता बांगलादेशमध्ये आहे. आणखी एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, तो बांगलादेशसोबत क्रिकेट मॅच खेळत आहे, माफ करा तो आता येऊ शकणार नाही. इतर अनेक युजर्सनीही अशा मजेशीर कमेंट केल्या.