बॉलिवुड अभिनेत्री उर्वशी रौटेला ला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही आहे. तिने विदेशात देखील भारताचे नाव मोठे केले आहे आणि लोक त्यांच्यावर गर्व करतात. उर्वशीचे चाहते नेहमी तिला विचारतात की ती पुढचा चित्रपट कोणता करत आहे. मात्र आता अभिनेत्रीने चित्रपटात काम करण्याबद्दल आपली एक इच्छा सांगितली आहे.
उर्वशी रौटेलाने अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र तिला बॉलिवुडच्या बादशहा सोबत काम करायचे आहे. होय, अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला शाहरुख सोबत काम करायचे आहे आणि ती योग्य संधीच्या शोधात आहे. यामुळे सोशल मीडियावर सध्या या गोष्टीबद्दल चर्चा सुरू आहे.
बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीमध्ये उर्वशी रौटेलाने शाहरुख खानसोबत एक फोटो शेयर केला होता. यावर तिचे चाहते खूपच खुश झाले होते. याबद्दल बोलताना उर्वशीने मुलाखतीत सांगितले होते की, ‘मला असे वाटते की माझे चाहते माझ्यावर खूप प्रेम करतात आणि ते मला खूप चांगल ओळखतात. मला खरंच शाहरूख सोबत स्क्रीन शेयर करायची आहे. मी एका चांगल्या संधीच्या शोधात आहे.’
उर्वशी पुढे म्हणते की, ‘सोशल मीडियाच्या माध्यमाने आपण चाहत्यांशी लगेच जुळू शकतो. एवढ्या प्रेमासाठी मी खूप आभारी आहे. मला फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे आहे आणि सर्वांचे मन जिंकायचे आहे. सर्वलोक माझ्या कुटुंबासारखेच आहेत.’ तसेच उर्वशी सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे 48 मिलियन फॉलोवर्स आहेत.