सोशल मीडिया सुपरस्टार उर्फी जावेद आपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. ती रोज नवनवीन पोशाख घालून रस्त्यावर येताना दिसते आणि तिचा पेहराव पाहून सगळ्यांचेच मन थक्क झाले आहे. मात्र, त्यामुळे उर्फीला अनेक टीकेला सामोरे जावे लागले आहे. पण ट्रोलर्सच्या बोलण्याकडे ती अजिबात लक्ष देत नाही आणि ती तिच्या आवडीनुसार कपडे परिधान करते.
उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली असून यावेळी ती तिच्या कपड्यांमुळे नाही तर तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तीने मीडियासमोर असे वक्तव्य केले, ज्यामुळे तीचे हसे झाले.
नुकतीच उर्फी जावेद एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. तिने अतिशय अनोखा ड्रेस परिधान केला होता. इव्हेंटमध्ये उर्फीला तिच्या जेवणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तिने सांगितले की पावसाळ्यात ती कणीस खात नाही कारण तिचे दात बनावट आहेत. जर मी कॉर्न खाल्ले तर माझे सर्व दात तुटतील कारण ते बनावट आहे.
उर्फी जावेदला खाण्यापिण्याची खूप आवड आहे आणि तीला पावसाळ्यातील खाणे आवडते. जेव्हा उर्फी जावेदने आपले दात बनावट असल्याचे सांगितले तेव्हा तीच्या चाहत्यांना धक्काच बसला. सुंदर दिसण्यासाठी उर्फी हेअर एक्स्टेंशन, नेल एक्स्टेंशन आणि इतर ब्युटी सर्जरी करत असते.
जरी लोक उर्फी जावेदची तीच्या विचित्र लूकसाठी ट्रोल आणि खिल्ली उडवतात. पण यामुळे तीला खूप प्रसिद्धी मिळते. काही काळापूर्वी, Urfi Google वर सर्वाधिक शोधली जाणारी आशियाई स्टार बनली होती. या प्रकरणात तीने कियारा अडवाणी, जान्हवी कपूरसारख्या अभिनेत्रींनाही मागे सोडले आहे.