असला विचित्र सिन दाखवल्या मुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका होतीये ट्रोल!!

गेल्या काही दिवसांत अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या मालिकांवर सतत टीका होते आहे. तरीही तो बघणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. मालिकांमधील चांगल्या गोष्टींवरही प्रेक्षक व्यक्त होताना दिसतायत. कलाकारांचं कौतुकही करतायत. परंतु अनेक गोष्टी ज्या प्रेक्षकांना खटकतायत त्यावर ते सोशल मीडियावर मत व्यक्त करतात. तर अनेकदा मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिनेता श्रेयश तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही नवीन मालिका सध्या चर्चेत आली आहे. या मालिकेत मध्यमवर्गीय अभिनेत्री आणि श्रीमंत अभिनेता असं कथानक दाखवण्यात आलं आहे.

असं म्हणातत की, कोणतंही सोंग करता येतं, पैशाचं नाही, तसंच काही तरी मालिकेत दिसून येत आहे. मालिकेत हिरो श्रीमंत दाखवण्यात येत असला तरी, काही गोष्टी दोखवताना बजेटमुळं हात आकडता घेण्यात आल्याचं दिसून आलं.

मालिकेत नुकताच एक हेलिकॉप्टरमधील सीन दाखवण्यात आला होता. खऱ्या हेलिकॉप्टरऐवजी खोट्या हेलिकॉप्टरमध्ये हा सीन शूट करण्यात आला होता. नेटकऱ्यांनी ही बाब पकडली आणि खिल्ली उडवण्यास सुरूवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *