‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये रीता रिपोर्टरची भूमिका साकारणारी प्रिया आहुजा आजकाल तिच्या पालकत्वाचा खूप आनंद घेत आहे. ती पालकत्वाशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अनेक वेळा ती बोल्ड स्टाईलमध्येही दिसली आहे. प्रिया आहुजा खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. तसेच तीच्या चाहत्यांनाही तीचा ऑफस्क्रीन अवतार खूप आवडतो.
रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी प्रिया आहुजा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचा संचालक मालव राजदासोबत दिसली आहे. मालव हा प्रियाचा नवरा आहे. प्रिया आहुजा पती मालव राजदासोबत खूप मजा करते. दोघेही एकत्र अनेक ट्रीपला जातात. प्रिया आहुजा प्रमाणेच, पती मालव राजदा देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. प्रिया आणि मालवची जोडी लोकांना खूप आवडते.
प्रिया आहुजा आणि तिचा पती मालव राजदाने सोशल मीडियावर अनेक वेळा मजेदार आणि रोमँटिक व्हिडिओ शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल झाले होते. प्रिया आहुजा आणि पती मालव राजदा हे एका बाळाचे पालक आहेत आणि दोघेही कौटुंबिक वेळ खूप एन्जॉय करतात. प्रिया आहुजा आणि मालव राजदा यांची ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सर्व स्टारकास्टसोबत चांगली बॉण्डिंग आहे.