तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सर्वांचा आवडता आहे. संपूर्ण भारतात या कार्यक्रमाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तसेच दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणीला तारक मेहता या शोद्वारे खूप लोकप्रियता मिळाली. तीने साकारलेले हे पात्र प्रत्येक घरात पसंत केले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ती या शोमध्ये उपस्थित नाहीये.
यानंतरही तीचे लाखो चाहते आजही दिशाचे जुने भाग पाहतात. तारक मेहता व्यतिरिक्त दिशाने अनेक गुजराती नाटकांमध्येही काम केले आहे. तीने बॉलिवूडमध्ये आपल्या चमकदार अभिनयाची छापही सोडली आहे. तसेच दिशाने तिच्या सुरुवातीच्या काळात काही बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले होते.
काही अहवालांनुसार, दिशा प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे 1.50 लाख रुपये घेत असे. याशिवाय तीने जाहिरातींमधूनही भरपूर कमाई केली आहे. दिशा ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोमधून दरमहा सुमारे 20 लाख रुपये कमवत असे. तारक मेहताच्या शोमध्ये भूमिका मिळण्यापूर्वी तीने इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष केला.
तिच्या सुरुवातीच्या काळात तीला बी ग्रेड चित्रपटांमध्येही काम करावे लागले होते. 1997 मध्ये आलेल्या ‘कामसिन: द अनटचड’ या चित्रपटातही दिशाने बोल्ड सीन्स दिले होते. तीने आपल्या मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर अनेक शोमध्ये काम करून भरपूर कमावले. दिशा वाकाणीचे पात्र आज देशभरातील कोट्यवधी लोकांनी पसंत केले आहे.
2017 मध्ये दिशा ने तारक मेहता शोला अलविदा म्हटले होते. त्या काळात ती आई होणार होती. त्यानंतर दिशा शोमध्ये दिसली नाहीये. शोचा नीर्माताा आणि दिशा यांच्यात काही काळापासून फीसंदर्भात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, शोच्या निर्मात्यांनी या दरम्यान दयाबेनसाठी इतर कोणतेही पात्र निवडले नाही. तारक मेहता शोमध्ये लोकांना खरी दया बेन पाहायला मिळावीी हा त्यांचा सर्वोत्तम प्रयत्न आहे.