सुष्मिता सेनचा खुलासा, ‘या’ कारणांमुळे सलमान खानने आजपर्यंत केले नाही लग्न,म्हणाली-सलमान आणि मी…..

भारताची पहिली मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन सध्या चर्चेत आहे. फरारी व्यावसायिकासोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांनंतर सोशल मीडियावर तिच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. कोणी तीला अनेक पुरुषांचे हृदय तोडणारी म्हणत आहेत तर कोणी तीला ‘गो’ल्ड डि’ग’र’ म्हणत आहेत. दरम्यान, या सर्व बातम्या आणि ट्रोल्सला चोख प्रत्युत्तर देत अभिनेत्रीने सर्वांचे बोलणे बंद केले. आता तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती सलमान खान सिंगल असण्यामागचे कारण सांगत आहे.

‘मैने प्यार क्यूं किया’ आणि ‘बीवी नंबर 1’ सारख्या चित्रपटांमध्ये सलमान खानची नायिका असलेल्या या अभिनेत्रीने सलमान खानच्या सिंगल राहण्याचे खरे कारण सांगितले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये होस्ट तिला सलमान खानच्या लग्नाचा प्रश्न विचारतो आणि म्हणतो, “सलमान खानला अनेकदा हा प्रश्न विचारला जातो, पण तो उत्तर देत नाही. तुम्हालाही हाच प्रश्न आहे.

यावर अभिनेत्री हसून उत्तर देते, ‘तुम्ही हाच प्रश्न दोन लोकांना विचारत आहात जे सिंगल लाईफ एन्जॉय करत आहेत. आम्हाला कोणी सापडले नाही म्हणून नाही तर आम्ही दोघांनी स्वतःच्या इच्छेने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी ललित मोदींनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सुष्मिता सेनचे अनेक फोटो एकामागोमाग एक पोस्ट केले आहेत, आधी तिला आपली ‘पत्नी’ म्हटले आहे, नंतर वाद वाढत असल्याचे पाहून तिला ‘गर्लफ्रेंड’ म्हणले आहे. यावर लोक सुष्मिता सेनकडून उत्तरांची मागणी करत होते, ज्यावर अभिनेत्रीने तिच्या मुलीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता की ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे आणि तिच्या बोटात एंगेजमेंट रिंगही नाही. सध्या ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *