अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रापासून विभक्त होण्याचा विचार करत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, शिल्पा शेट्टी तिच्या मुलांसह राज कुंद्रापासून वेगळे होण्याची योजना आखत आहे. जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला तर शिल्पा राजचे घर सोडून नवीन घरात शिफ्ट होऊ शकते.
शिल्पाच्या एका मित्राच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्राच्या अटकेमुळे तिला खूप दुःख झाले आहे. तीला राजच्या व्यवसायाची कल्पना नव्हती. ही रहस्ये उघडकीस आल्यापासून ती खूप दुःखी आहे. मित्राच्या म्हणण्यावर प्रकाशित झालेल्या या बातमीनुसार शिल्पा शेट्टी राज कुंद्राच्या पैशाला हातही लावू इच्छित नाहीये.
शिल्पा शेट्टी काम करत आहे आणि ती स्वतः तिच्या मुलांची काळजी घेणार आहे. अलीकडेच शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. ज्यात ती खूप भावूक दिसत होती. या पोस्टमध्ये तीने एका पुस्तकाच्या काही भागाचा फोटो शेअर केला आहे. ज्यात जीवनाच्या चुकांबद्दल लिहिले होते.
शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या फोटोमध्ये असे लिहिले होते की चुका कर्जाच्या त्या भागासारख्या असतात. ज्यासाठी तुम्हाला आयुष्याची किंमत मोजावी लागते. चुका केल्याशिवाय आपण आपले जीवन मनोरंजक बनवू शकत नाहीत. आपण आशा बाळगली पाहिजे की त्या धोकादायक चुका नाहीत किंवा लोकांना त्यामुळेे दुुःख होणार नाही. पण चुका होतात.
शिल्पाने शेवटी लिहिले होते की मी चुका करेन, मी स्वतःला माफ करेन आणि त्यातून शिकेलं. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने सुपर डान्सर चॅप्टर 4 च्या सेटवर येण्यास नकार दिला. तथापि, आता शिल्पा कामावर परतली आहे. जर अहवालांवर विश्वास ठेवला, तर शिल्पा शेट्टीने केवळ या अटीवर शोमध्ये परत येण्याचे मान्य केले होते की ती कोणत्याही वादग्रस्त प्रश्नांची उत्तरे देणार नाही.
याशिवाय शिल्पाला अनेक चित्रपटांच्या ऑफरही येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग बासू आणि प्रियदर्शिनीने शिल्पा शेट्टीला त्यांच्या चित्रपटात भूमिका करण्याची ऑफर दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे, शिल्पा चा पती राज कुंद्राला गुन्हे शाखेने 19 जुलै 2021 रोजी अश्लील चित्रपट बनवून अॅपवर रिलीज केल्याबद्दल अटक केली होती.
तिच्या पतीला अद्याप जामीन मिळालेली नाहीये, आणि 19 जुलैपासून तो पोलीस कोठडीत आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी अभिनेत्रीचीही चौकशी केली आहे. पोलिसांनी शिल्पाची तिच्या घरी जाऊन चौकशी केली होती. शिल्पा राजच्या घरी आई आणि बहिणीसोबत राहते. या घराची किंमत 100 कोटी आहे. हे घर राजाने शिल्पाशी लग्न केल्यानंतर खरेदी केले होते.