बॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणजेच संजय दत्त, ज्यांना आपण संजू बाबा म्हणूनही ओळखतो, त्यांची प्रेमकथा अलीकडेच ऐकायला मिळत आहे. संजू बाबाची ही प्रेम कहाणी ऐकण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. खरंतर एकदा संजू बाबा एअर होस्टेसच्या प्रेमात पडले होते, तेही पहिल्याच नजरेत.
पण त्यांच्यात एक कारण होतं ज्यामुळे त्यांचे प्रेम पूर्ण होऊ शकले नाही आणि ते अपूर्णच राहिले. संजू बाबा एअर होस्टेसच्या प्रेमात कसे पडले आणि त्याचं प्रेम अपूर्ण कसं राहिलं?
खर तर त्यांची ही प्रेम कहाणी त्यांच्या एका पुस्तकातून आपल्याला कळत आहे. संजय दत्तच्या खूप कथा आहेत, पण सर्वात खास ही अनटोल्ड स्टोरी आहे. ज्यामध्ये संजय दत्तने एअर होस्टेसला प्रपोज करण्यासाठी प्रेमापासून ते सर्व काही सांगितले आहे. संजू बाबा एअर होस्टेसच्या प्रेमात पडला होता, तिचे नाव “शा” होते. वास्तविक संजू बाबा पहिल्याच नजरेत शा च्या प्रेमात पडले होते आणि संजू बाबाने देखील शा सोबत लग्न करण्याचा विचार केला होता.
संजय दत्त त्याच्या ‘नाम’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी फिलीपिन्सला जात होते, पण त्याच विमानात त्याला एअर होस्टेस शा दिसली. दोघेही पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर दोघेही एकमेकांच्या नात्यात आले.
संजय दत्तला शा सोबत लग्न करायचे असले तरी त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर ती नोकरी सोडून घर आणि त्यांची काळजी घेईल, अशी संजय दत्तची इच्छा होती. शा ला ही अट आवडली नाही आणि तिने संजू बाबाशी लग्न करण्यास नकार दिला आणि त्यामुळे त्याची प्रेमकहाणी अपूर्ण राहिली…..
या कारणामुळे संजू बाबाचे प्रेम राहिले अधुरे, प्रेमिकाने ठेवल्या होत्या या आटी…..
