सलमानच्या या अभिनेत्री सोबत तिच्या नवऱ्याने केलं होतं असं काही, ज्यामुळे झालेत असे हाल, पहा फोटो
रंभा ही अभिनेत्री तुम्हाला आठवते का? तीच रंभा जिने सलमान खानबरोबर ‘जुडवा’ आणि ‘बंधन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये रोमान्स केला होता आणि ठुमके देखील लावले होते? जर हो, तर आपल्याला माहित आहे का की ही नायिका आज कोठे आहे, ती काय करत आहे आणि ती कशी दिसते आहे?
रंभाने तेलुगू चित्रपटांद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती पण 90 च्या दशकात ती बॉलिवूडमधील सर्वोच्च नायिकांपैकी एक होती आणि सर्वांच्या आवडीची होती. बॉलिवूडमधील लोकांनी तिला दिव्या भारतीची डुबलीकेट म्हटले. पण काही हिट चित्रपट दिल्यानंतर रंभाची बॉलिवूड कारकीर्द ढासळू लागली आणि तिच्या झोळीत फक्त छोट्या छोट्या भूमिका येऊ लागल्या.
हे रोल करण्याऐवजी रंभाने चित्रपटांमधून निवृत्त होणे पसंत केले. त्यानंतर 2010 मध्ये तिने इंद्राण पद्मनाथन या व्यावसायिकाशी लग्न केले. त्यांना लान्या आणि साशा या दोन मुली आहेत. रंभा असा विचार करत होती की ति चित्रपटांपासून दूर राहून फक्त घर सांभाळेल, पण झालं उलटंच .
लग्नाच्या काही वर्षानंतरच रंभा आणि तिचा नवरा यांच्यामध्ये भां ड ण झाल्याच्या बातम्या सुरू झाल्या आणि त्यामुळे ते विभक्त झाले. अशी बातमीही आली होती ज्यात असे म्हटले होते की रंभाशी लग्नाच्या वेळी तिचा नवरा आधीच विवाहित होता आणि त्याने ते रंभापासून लपवले होते. एवढेच नव्हे तर सासरच्या लोकांनीही रंभाला त्रास दिला आणि मुलींना भेटण्यास बंदी घातली.
नंतर रंभाचे पती आणि सासरच्यांनी तिची माफी मागितली, पण नंतर परिस्थिती तीच होती. त्यानंतर रंभाने तिच्या पतीला सोडले आणि त्यानंतर मुलीचा ताबा घेण्यासाठी रंभाने गेल्या वर्षी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली आणि अद्याप ख ट ला चालू आहे.
एकेकाळी लाखो चाहते असणारी रंभा आज खूप बदलली आहे. तिचा चेहरा मोहरा तसेच तीच्या चेहऱ्यावरील हाव भाव यांत बरेच बदल झाले आहेत. नक्कीच, आता ती पूर्वीपेक्षा जरा जाड झाली आहे, परंतु तिचे आकर्षण आणि सौंदर्य अजूनही त्याच प्रकारे अखंड आहे.