सलमान खानच्या या अभिनेत्रीला आता बघून ओळखणे अवघड झाले आहे. सलमान खानची ही अभिनेत्री आता पहिल्यापेक्षा जास्त सुंदर झाली आहे. या अभिनेत्रीने सलमान खानसोबत चित्रपट सुर्यवंशी मध्ये काम केले होते. तथापि, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरू शकला नव्हता.
सध्यातरी या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टी सोडून दिली आहे आणि आपल्या विवाहित जीवनात व्यस्त आहे. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री शीबाबद्दल. शीबाने अभिनयाची सुरुवात बॉलीवुड मधून नाही तर तमिळ चित्रपटांपासून केली होती. ज्यानंतर तिने बॉलिवुड मध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला.
अभिनेत्रीने सन 1991 मध्ये ‘ये आग कब बुझेगी’ या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. बॉलिवुड मधील मोठ-मोठ्या कलाकारांसोबत काम करून देखील शीबा बॉलिवूड मध्ये एक जागा निर्माण नाही करू शकली. सन 1992 मध्ये आलेल्या चित्रपटात सलमान खानची अभिनेत्री असलेली शीबा आज देखील खूप तंदुरुस्त आणि सुंदर आहे.
लग्नानंतर शीबा तिचा वैवाहिक जीवनात खूप व्यस्त झाली आहे सोबतच अभिनेत्रीने आता बॉलिवूड पासून आपला रस्ता वेगळा केला आहे. मात्र अभिनेत्रीची सुंदरता अजून देखील आहे. शीबा चा जन्म 1 जानेवारी 1970 रोजी मुंबई मध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला होता. तिच्या पतीचे नाव आकाशदीप आहे. आकाशदीप एका अभिनेता बरोबरच दिग्दर्शक देखील आहे.