बॉलिवूडचा हँडसम हंक सलमान खान अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आहे. सलमानचे नाव अनेक सुंदरींशी जोडले गेले होते पण त्याचे प्रेमसंबंध लग्नाच्या बंधनात सापडले नाहीत. तसेच सलमानने वयाची पन्नाशी ओलांडली आहे, पण त्याने अजून लग्न केलेले नाही. सलमानच्या सर्व चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न घुमतो आहे की, तो दिवस कोणता असेल जेव्हा बॉलिवूडचा दबंग खान घोड्यावर चढेल.
काही दिवसांपूर्वीच सलमान खान भाऊ अरबाजसोबत एका टॉक शोच्या नवीन सीझनला गेला होता. शोचे स्वरूप असे होते की शोमध्ये आलेल्या अरबाजच्या पाहुण्यांना लोकांचे ट्विट वाचून त्यांना उत्तर द्यायचे होते. त्यानंतर एका युजरने सलमानसाठी असे एक ट्विट केले, जे ऐकून सलमान खानसुद्धा स्वतःच हैराण झाला आणि मग त्याने स्वतःच या ट्विटला उत्तर दिले.
अरबाजने हे ट्विट वाचले, ज्यात स्पष्ट लिहिले होते की, ‘कुठे लपला आहे रे.भारतात, प्रत्येकाला माहित आहे की दुबईमध्ये तु पत्नी नूर आणि 17 वर्षांच्या मुलीसह आहेस. तु भारताच्या लोकांना कधी पर्यंत मूर्ख बनवणार आहेस? सलमानने हे ट्विट ऐकताच त्याला आश्चर्य वाटले आणि त्याने त्याच्या भावाला विचारले की, ‘हे कोणासाठी आहे’?अरबाजने सांगितले की ही टिप्पणी फक्त सलमानसाठीच आहे. तर या ट्विटला उत्तर देताना सलमान म्हणाला की, ‘या लोकांना खूप माहिती आहे.
या सर्व गोष्टी पूर्ण बकवास आहेत. मला माहित नाही की हे कोण बोलत आहे आणि ते कोठून पोस्ट केले गेले आहे. जो कोणी असा विचार करत आहे, मला त्याला उत्तर द्यायचे आहे की, भाऊ, मला कोणतीही पत्नी नाहीये. मी वयाच्या 9 व्या वर्षापासून भारतातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहे. मी या व्यक्तीला उत्तर देत नाहीये, मी कुठे राहतो हे संपूर्ण जगाला चांगलेच माहित आहे ‘.