सैफ अली खान चार मुलांचा पिता आहे. अमृता सिंह म्हणजेच पहिल्या लग्नातून 2 मुले आणि दुसऱ्या लग्नातून 4 मुले आहेत. आता हल्लीच एका मुलाखतीत करीना म्हणाली की सैफ जेव्हापासून अडल्ट झाले आहेत तेव्हा पासून प्रत्येक दशकात त्यांचे मुले झाले आहेत. यामुळे मी त्यांना सांगितले आहे की आता 60 व्या वर्षी नवीन मुलाची योजना करू नका. सैफ 50 व्या वर्षी जेह चा पिता झाला आहे.
याच बरोबर करीना मुलाखतीत म्हणाली की, सैफचा प्रत्येक दशकात मुलगा झाला 20,30,40 आणि 50. मी त्यांना सांगितले आहे की आता 60 मध्ये असे काही होणार नाही आहे. मला असे वाटते की सैफ सारखा माणूसच प्रत्येक पायरीवर 4 मुलांचा बाप बनू शकतो. ते त्यांचा वेळ प्रत्येक मुलाला देतात. आम्ही जेह सोबत समतोल ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही दोघांनी मिळून एक ठराव पण केला आहे.
जेव्हा सैफ आपल्या चित्रीकरणात व्यस्त असतील तर त्यावेळेस मी घरी राहून मुलांना वेळ देईल. करीना पुढे म्हणाली की, सैफ आणि तैमूर यांची बोंडींग पण चांगली आहे. तैमूरला लोक आवडतात. जर घरी लोकं असतील तर तो लगेच भेटायचा प्रयत्न करतो. तो छोटा सैफ आहे, रॉक स्टार बनायचं आहे त्याला. दोघांची पण जबरदस्त बाँडींग आहे.