बॉलिवूडच्या जगाबद्दल असे म्हटले जाते की जर वडील एक अभिनेता असेल तर त्याची मुले हे देखील या जगात नाव कमावतात. परंतु असे होणेच आवश्यक नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांची मुले बॉलिवूडच्या जगापासून दूर आहेत. आणि त्यांच्याकडे पैशांची कमतरता नाहीये. त्यातील एक म्हणजे बॉलिवूड सुपरस्टार ऋषी कपूरची यांची मुलगी. ऋषी कपूरच्या मुलीबद्दल जाणून घेण्यापूर्वी आम्ही तुम्हाला ऋषी कपूरबद्दल काही सांगणार आहोत.
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी झाला होता. अभिनयाची गुणवत्ता त्याच्यात वारशाने प्राप्त झाली. त्याचे वडील आणि आजोबा हे त्यांच्या काळातील उत्कृष्ट कलाकार होते. ही परंपरा सांभाळत ऋषी कपूर यांनी इंडस्ट्रीत एक विशेष स्थान मिळवले.
ऋषी कपूर नंतर त्यांचा मुलगा रणबीर कपूरनेही कुटुंबाचा वारसा सांभाळला आणि आज बॉलिवूडमध्ये तो एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का ऋषी कपूरला एक मुलगी देखील आहे, जिने आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच करियर म्हणून अभिनय करणे निवडले नाही.
रिद्धिमा करीना कपूरपेक्षा 6 दिवस मोठी आहे – ऋषी कपूरने अभिनेत्री नीतू सिंगशी लग्न केले. त्यांना दोन मुले, एक मुलगा रणबीर कपूर आणि एक मुलगी रिद्धिमा कपूर. रिद्धिमा बद्दल तुम्हाला क्वचितच माहित असेल. तिचा जन्म 15 सप्टेंबर 1980 रोजी झाला होता. कपूर खानदान बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत असताना, रिद्धीमा या चमचमणाऱ्या या बॉलिवूडच्या जगापासून दूर आहे. रिद्धिमा वयाने करिना कपूरपेक्षा फक्त 6 दिवस मोठी आहे. रिद्धिमाने फॅशन डिझायनिंग आणि इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स केला आहे.
आज, रिद्धिमा ही फॅशन इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे.रिद्धिमाचा R ज्वेलरी नावाचा ज्वेलरी ब्रँड देखील आहे. रिद्धिमाला लहानपणापासूनच बॉलिवूडमध्ये प्रवेश करायचा नव्हता, ज्यामुळे तिने स्वत: चा मार्ग निवडला. तिला नेहमीच दागिने डिझाइन करण्याची इच्छा होती आणि तिने तेच केले.
रंगीबेरंगी रत्नांवर काम करणे आणि आणि त्याचे दागिने बनविणे मला आवडते असे रिद्धिमा सांगते. या निवडीमुळे रिद्धिमाने आपले करिअर बनविले आणि आज ती यशस्वी आहे. रिद्धिमाने तिचा मित्र आणि दिल्ली येथील व्यावसायिक भारत सहनीशी 25 जानेवारी 2006 रोजी लग्न केले.
दोघांची पहिली भेट 1997 मध्ये लंडनमध्ये झाली होती. यानंतर 2001 मध्ये दोघांची एका लग्नाच्या वेळी मुंबईत भेट झाली. येथूनच दोघे जवळचे मित्र झाले. जवळजवळ 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. 2 मार्च 2011 रोजी, रिद्धिमाने एका मुलीला जन्म दिला, रिद्धिमाच्या मुलीचे नाव समारा आहे. भरतबद्दल बोलु तर तो गारमेंट एक्सपोर्ट कंपनीचा मालक आहेत. रिद्धीमा आज कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.