बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणार्या अक्षय कुमार आणि बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांच्यातील नात्यामुळे बर्याचदा ते चर्चेत राहिले आहे.दोघांचे लग्न झाले नव्हते, पण एक काळ असा होता की त्यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा होती आणि काही मुलाखतींमध्ये अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनीही त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले, एका मुलाखतीत अक्षय कुमारने रवीनाशी असलेल्या संबंधाबद्दल काही धक्कादायक खुलासे केले.
९०दी च्या दशकात अक्षय आणि रवीना यांच्यातील प्रेमाच्या कहाण्या बऱ्याच चर्चेत होत्या.चाहत्यांनाही ही जोडी बरीच आवडली.दोन्ही स्टारने बर्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केले आहे, म्हणूनच रविना आणि अक्षयच्या ऑनस्क्रीन सोबतच ऑफस्क्रीनची ही केमिस्ट्री चाहत्यांना आवडली होती. त्यावेळी दोघेही लवकरच लग्नाची घोषणा करणार असल्याची बातमीही समोर आली होती, त्यानंतर बातमी आली की दोघांनी शांतपणे लग्न केले आहे.अक्षय कुमारने आपल्या एका मुलाखतीत या गुप्त विवाहाबद्दल सांगितले ही होते.
अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचे1998 मध्ये ब्रेकअप झाले, या ब्रेकअपनंतर रवीना टंडनबरोबर तुम्ही गुप्त विवाह केले का असे विचारले असता अक्षयने गुप्त लग्नाविषयी खुलासा केला. त्याने उत्तर दिले की रवीना बरोबर साखरपुडा नक्कीच झाला होता, लग्न झाले नव्हते.
रविना टंडन सोबत ब्रेकअप झाल्यावर अभिनेता अक्षय कुमारने केला मोठा खुलासा.
