आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. यासोबतच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर अधिकृतरित्या मिस्टर आणि मिसेस झाले आहेत. दोन दिवसापासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचे फोटोज इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. चाहते लगातार आलिया भट्ट आणि रणबीर यांच्या लग्नाबद्दलच बोलत आहेत.
याच दरम्यान सोशल मीडियावर रणबीर कपूरची एक्स प्रियसी दीपिका पादुकोणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर हंगामा करत आहे. या व्हिडिओ मध्ये दीपिका पादुकोण चित्रपट ‘ ये जवानी है दिवानी ‘ या चित्रपटातील एक डायलॉग बोलताना दिसत आहे. तर, दीपिका पादुकोण रणबीरला म्हणते की लाख प्रयत्न केल्यानंतर देखील काही ना काहीतरी निघून जातंच. आता हे तर सर्वांनाच माहीत आहे की दीपिका आणि रणबीर यांची प्रेम कहाणी पूर्ण होऊ शकली नाही.
अशामध्ये चाहत्यांना आता दीपिका आणि रणबीर या जोडीची देखील आठवण येत आहे. चाहते आज देखील दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांना एकत्र काम करताना बघायला उत्सुक आहेत. रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण एकेकाळी बॉलिवुड मधील पॉवर कपल होते. दोघांनीही सन 2007 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. दोघांचीही भेट त्यांचा चित्रपट ‘ बचना ए हसीनो ‘ या पासून झाली होती.
जिथे दोघांचेही एकमेकांवर प्रेम झाले होते. मात्र दोन वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचाही ब्रेकअप झाला, या दोघांचाही ब्रेकअप खूप वाईट होता. अनेक वर्षांपर्यंत दोघेही एकमेकांसोबत बोलत नव्हते. रणबीर आणि आलियाने सन 2018 मध्ये सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये एकत्र आपली सार्वजनिक उपस्थिती लावली होती.