लाडका मुलगा रणबीर कपूरच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान नीतू कपूर ह्या डान्स दिवाणे ज्युनिअर च्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. कार्यक्रमाच्या सेटवरून आता नीतू कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो की सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्ये नीतू आपल्या मुलाच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले की वेगळीच प्रतिक्रिया देते, ज्याची खूप चर्चा होत आहे.
खरंतर, डान्स दिवाणे ज्युनिअर च्या सेटबाहेर नीतू कपूरला बघून मीडिया त्यांच्याशी रणबीरच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारायचा प्रयत्न करतात. मात्र मीडियाच्या प्रश्नावर नीतू म्हणते की, विचारूच नका. नीतू कपूर यांच्या बोलण्यावर कार्यक्रमामधील दुसरे जज देखील विनोदी अंदाजात म्हणतात की, मॅडमला प्रश्न विचारला की टेन्शन येतं.
कपूर आणि भट्ट कुटुंबात जिथे रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तयारी सुरू आहे, तसेच दुसरीकडे रणबीर आलिया आणि नीतू कपूर लग्नाच्या तयारी बरोबरच आपले काम देखील पूर्ण करत आहेत. मुलाच्या लग्नाच्या तयारी दरम्यान नीतू कपूर डान्स रियालिटी शो डान्स दिवाणे शो ची चित्रीकरण करताना दिसली.
नीतू या कार्यक्रमाची जज आहे. नीतू सोबत नोरा फतेही आणि मर्जी पेस्तोनजी देखील या कार्यक्रमाचे जज आहेत. आलिया भट्ट आपला चित्रपट ‘रॉकी ओर राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. तसेच दुसरीकडे रणबीर देखील आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र आता सर्वांच्या नजरा रणबीर आणि आलिया यांच्या लग्नावर आहे.