बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्स कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी आलिया भट्टने तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती, याशिवाय इतर अनेक अभिनेत्रीही यावेळी प्रेग्नंट आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीबाबतही सध्या सोशल मीडियावर दावा केला जात आहे. राणी मुखर्जी दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे बोलले जात आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी ती गरोदर आहे आणि तिच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे.
राणी मुखर्जीच्या व्हायरल झालेल्या फोटोंबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत. खरं तर, जेव्हा अभिनेत्री साडी नेसून पूजा करण्यासाठी मंदिरात आली तेव्हा लोकांना तिच्या फोटोंमध्ये बेबी बंप दिसत होता. तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट करत तुम्ही प्रेग्नंट आहात का असा प्रश्न विचारला.
मात्र, चाहत्यांच्या प्रश्नांना राणी मुखर्जीने कोणतेही उत्तर दिलेले नाही. राणी मुखर्जीने 2014 मध्ये प्रसिद्ध फिल्ममेकर आदित्य चोप्रासोबत लग्न केले होते, त्यानंतर 1 वर्षानंतरच तिने एका मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचे नाव आदिरा चोप्रा असून तिचे वय ६ वर्षे आहे.
जर राणी मुखर्जी खरोखरच गरोदर असेल तर आदिराला लवकरच तिचा भाऊ किंवा बहीण मिळणार आहे. राणी मुखर्जीच्या आधी ऐश्वर्या राय कपूर, करीना कपूर खान, काजोल, विद्या बालन यांसारख्या अनेक अभिनेत्रींनीही गर्भवती असल्याचा दावा केला होता, त्या केवळ अफवा ठरल्या. अशा परिस्थितीत राणी मुखर्जी गरोदर असल्याचा दावाही केवळ अफवा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अभिनेत्री राणी मुखर्जी वयाच्या 44 व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई?? लवकरच घरी येणार एक छोटा पाहुणा….
