बॉलिवूड ची ‘ देसी गर्ल ‘ प्रियंका चोप्रा आणि निक जोनस च्या घरी एक छोटी परी आली आहे. पीपल मॅगझिन मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार प्रियांकाची ननंद सोफी टर्नर ने एका मुलीला जन्म दिला आहे.
सोफी टर्नर च्या पतीचे नाव हे जो जोनस आहे, जे निक जोनस चे मोठे भाऊ आहेत. जो आणि सोफी यांनी आपल्या मुलीचे नाव विला ठेवले आहे.
गेम ऑफ थ्रोन मधील अभिनेत्री सोफी टर्नर ने 22 जुलै ला लॉस एंजेलिस मधील रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. सोफिच्या छोट्या पाहुण्याच्या आगमनाने त्यांची जोडी व कुटुंब हे खूप खुश आहे. सोफी टर्नर च्या गरोदरपणात बेबी पंप फ्लोंन्ट करण्याचे अनेक छायाचित्र समोर आले होते.
सोफिने स्वतः आपल्या गरोदरपणाची बातमी यावर्षी फेब्रुवारी मध्ये आपल्या चाहत्यांना दिली होती. जेव्हा चाहत्यांना या विषयी समजले तेव्हा ते घरातील छोट्या पाहुण्याची वाट पाहू लागले. सोफी चे वय हे केवळ 24 वर्ष आहे. खरतर सोफी ही प्रियंकाची ननंद आहे परंतु वयाने ती प्रियंकापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे.
सोफी आणि जो यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांची पहिली मुलाखत ही 2016 साली झाली होती. याच वर्षी दोघांनीही एकमेकांना डेट करणे सुरू केले होते. दोघेही सोशल मीडियावर जुळलेले आहेत आणि दिवस दिवस ते सक्रिय सुद्धा राहतात. दोघांची बोंडींग ही खूपच चांगली आहे.