प्रभासला डेट करण्याच्या वृत्तावर क्रिती सेननने केला खुलासा म्हणाली- आमच्या लग्नाची तारीख….

अभिनेत्री क्रिती सेननने अभिनेता प्रभाससोबत डेटिंगच्या बातम्यांवर मौन सोडले आहे.क्रिती सेननने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक नोट शेअर करून संपूर्ण गोष्ट सांगितली आहे.बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या ‘भेडिया’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यासोबतच ती तीच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून क्रिती सेनन आणि प्रभास एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या.

खरं तर, क्रिती सेनॉनचा भेडिया सहकलाकार वरुण धवन याने एका रिअॅलिटी शोदरम्यान संकेत दिला होता की तीच्या हृदयात प्रभास आहे. मात्र, यावेळी वातावरण खूपच मजेदार होते. तेव्हापासून क्रिती सेनन आणि प्रभासच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या.आता क्रिती सेननने या बातम्यांवर प्रतिक्रिया देत सत्य सांगितले आहे.

वरुण धवन आणि क्रिती सेनन ‘झलक दिखला जा 10’ च्या सेटवर पोहोचले होते. M यादरम्यान करण जोहरने वरुण धवनला विचारले की क्रिती सेनॉनचे नाव यादीत का नाही? यावर वरुण धवन म्हणाला, ‘क्रितीचे नाव तिथे नव्हते कारण क्रितीचे नाव… कोणाच्या तरी हृदयात आहे. एक माणूस आहे जो मुंबईत नाही, तो सध्या शूटिंग करत आहे. दीपिका पदुकोणसोबत. यानंतर तो प्रभासचाच उल्लेख करत असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. जो सध्या दीपिका पदुकोणसोबत प्रोजेक्ट केच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास आणि क्रिती सेनन काम करताना दिसनार आहेत. या चित्रपटात प्रभास रामची भूमिका साकारत असून क्रिती सेनॉन जानकीची भूमिका साकारत आहे. तर ‘आदिपुरुष’ चित्रपटात सनी सिंग लक्ष्मणची भूमिका साकारत आहे तर सैफ अली खान रावणाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *