पती निक जोनसपेक्षाही जास्त श्रीमंत आहे प्रियांका चोप्रा, इतक्या कोटींची आहे मालमत्ता.

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा 18 जुलै ला आपला 38 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अनेक सुपरहिट चित्रपटात काम करणारी प्रियंका नुकतीच पती निक जोनस सोबत अमेरिकेत स्थलांतरित झाली आहे.

त्यांनी बॉलिवूडमध्ये नव्हेच तर हॉलिवूड मध्ये आणि बऱ्याच दूरदर्शन मालिकेत सुद्धा दीर्घ काळासाठी आपला चमकदार अभिनय दर्शवीला आहे. प्रियंका चोप्रा ने वर्ष 2018 मध्ये अमेरिकन पॉप गायक निक जोनस सोबत लग्न केले आणि तेव्हापासूनच त्या अमेरिकेत स्थलांतरित झाले.

विशेष गोष्ट मध्ये निक जोनस हे आपली पत्नी प्रियंका पेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत. तर मालमत्तेच्या बाबतीतही निक हे प्रियंका पेक्षा खूप मागे आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत की निक आणि प्रियंका यांची किती मालमत्ता आहे आणि कसे आहे त्यांचे आरामदायी आयुष्य

बातमीनुसार प्रियंकाकडे जवळपास 200 कोटीहून अधिक संपत्ती आहे. तसेच निक जोनस बद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे 170 कोटींची संपत्ती आहे. दोघांनाही आरामदायी आयुष्य आवडते आणि त्यांच्याकडे भव्यदिव्य बंगल्यापासून ते महागड्या गाड्यांपर्यंत सर्व सुख सोयी आहेत.

प्रियंकाने निक जोनस सोबत लग्नानंतर कॅलिफोर्निया मध्ये 144 कोटी रुपयांचा एक आलिशान बंगला विकत घेतला होता. या आलिशान बंगल्यात 7 शयनकक्षे आणि 11 स्नानगृहे आहेत. बंगल्याभोवती आजूबाजूला हिरवळ आहे.

निक आणि प्रियंकाने जगातील अनेक ठिकाणी आलिशान बंगले विकत घेतले आहेत. गोव्यातही त्यांचा एक बंगला आहे, जो खूपच रमणीय आणि आरामदायक आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, निक आणि प्रियांकाचा हा बंगला गोव्याच्या बागा बीच जवळ आहे. असे सांगितले जाते की या बंगल्याची किंमत ही 20 कोटी रुपये आहे. प्रियांकाला बऱ्याच वेळा येथे सुट्ट्या घालवता दिसली आहे.

मुंबईत देखील प्रियंकाचा एक बंगला आहे, ज्याचे नाव दरिया महल हे आहे. मुंबईत वर्सोवा मध्ये असलेल्या या बंगल्याची किंमत 100 कोटी सांगितली जाते. असे मानले जाते की दरिया महल हा प्रियंकाचा सर्वात आवडता बंगला आहे. या बंगल्याची खास गोष्ट आहे की हा बंगला सन 1930 मध्ये ब्रिटिश स्थापत्यकाराने बांधली आहे.

बंगल्याशिवाय प्रियंकाला महागड्या गाड्यांची पण हौस आहे. त्यांच्याकडे हार्ले डेविडसन स्ट्रीट 500 रेसिंग मोटारसायकल आहे. या मोटारसायकलची किंमत 4 लाखापेक्षा जास्त आहे. विशेष गोष्ट म्हणजे प्रियंकाने ही मोटारसायकल तेव्हा विकत घेतली होती जेव्हा, खतरों के खिलाडी या मालिकेची त्या समालोचन करत होत्या.

प्रियंकाकडे महागड्या गाड्या पण आहेत. त्यांच्याकडे रोल्स रॉयल घोस्ट आहे, ज्याची किंमत 5 कोटी 25 लाख एवढी आहे. याशिवाय बीएमडब्लू 7 आहे, जी 1 कोटी 95 लाख रुपयांची आहे. याशिवाय प्रियंका मर्सिडीज बेंझ एस क्लास ( 1 कोटी 21 लाख रुपये ), पोर्श केयेन ( 1 कोटी 4 लाख रुपये ), कर्मा फिशर ( 76 लाख रुपये ), बीएमडब्लू 5 ( 52 लाख रुपये ) यांसारख्या गाड्यांची मालकीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *