बॉलिवूडची देसी गर्ल आता देसी राहिली नाहीये, आता ती आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे. आज तीचे चाहते जगभरात उपस्थित आहेत. ग्लोबल स्टार बनलेली प्रियंका चोप्रा आता परदेशी माध्यमांमध्येही अनेक वेळा प्रसिद्धी मिळवते. प्रियंका चोप्रा केवळ अभिनयातच चांगली नाही तर तीचा फॅशन सेन्स देखील लोकांना खूप आवडतो. तसेच सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली प्रियांका दररोज तिचे व्हिडिओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत राहते.
प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांची छायाचित्रेही लोकांना खूप आवडतात. अलीकडेच प्रियांका चोप्राने असाच एक अतिशय ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा पती निक जोनस देखील या चित्रांमध्ये दिसत आहे. ही चित्रे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. काही लोकांना हे चित्र खूप प्रेमळ वाटत असताना, काही लोकांना हे चित्र आवडत नाहीये.
प्रियंका चोप्राने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या चित्रात अभिनेत्री बिकिनीमध्ये सनबाथ एन्जॉय करताना दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्री प्रियांका तीचे टोन्ड फिगर दाखवताना दिसत आहे. दुसरीकडे, जर आपण दुसऱ्या चित्राबद्दल बोललो तर यात अभिनेत्री तिच्या पोटावर झोपलेली दिसत आहे आणि निक जोनास तिच्या मागे चाकूने काहीतरी करताना दिसत आहे. हे चित्र शेअर करताना प्रियंकाने कॅप्शनमध्ये लिहिलेे आहे की, ‘स्नॅक.’ मात्र, यावेळी प्रियांकाला लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.
हे पाहून प्रियांकाची बहीण परिणीती चोप्राने टिप्पणी केली आहे की-जिजू, दीदी, तुम्ही हे काय करत आहात. इन्स्टावर कुटुंबातील सदस्यही आहेत. मी माझे डोळे बंद करून लाईक बट्न दाबत आहे. तसेच यावर टिप्पणी करताना एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘भारताचे संस्कार विसरली, लाज विसरली आहे.’ दुसऱ्याने लिहिले आहे, ‘अरे तुम्ही काय पाहत आहात.’ वापरकर्ते प्रियांकाला संस्कारचे धडे देत आहेत