नुकताच बाळाला जन्म दिलेल्या या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणली-बाळाचे वडील मला माहित नाहीत…

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे. गरोदर असल्यापासूनच नुसरत जहाँ चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. नुसरत पती निखिल जैनपासून विभक्त झाल्या आहेत.

शिवाय निखिल जैन यांनी देखील बाळ त्यांचं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे बाळ कुणाचं अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. आई झाल्यानंतर नुरसत यांनी पहिल्यांदाच एका कार्यरक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी पुन्हा एकदा नुसरत जहाँ यांनी बाळाच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

नुसरत जहाँ यांनी कलकत्ता येथे एका सलुनच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. यावेळी पत्रकारांनी त्यांना बाळीची पहिली झलक कधी पाहायला मिळेल? असा प्रश्न विचारला होता. यावर त्या म्हणाल्या, “तुम्हाला याबद्दल बाळाच्या वडिलांना विचारायला हवं, ते कुणालाही बाळाला पाहू देत नाहीत.” यावर पत्रकारांनी लगेचच नुसरत यांना बाळाच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारला.

या प्रश्नावर उत्तर देत त्या म्हणाल्या, “एखाद्या महिलेला बाळाचे वडील कोण आहेत हे विचारणं म्हणजे तिच्या चारित्र्यावर सवाल उपस्थित करणं आहे. बाळाचे वडील कोण आहेत हे वडिलांना माहीत आहे आणि या क्षणी आम्ही एकत्र पालकत्वाचे सुंदर क्षण अनुभवत आहोत. मी आणि यश, आम्ही चांगला वेळ घालवत आहोत.” असं सूतक उत्तर नुसरत जहाँ यांनी दिलं आहे.

यावेळी नुसरत जहाँ यांनी मातृत्वाचा अनुभव खूपच सुंदर असल्याचं सांगितलं. “हे एक नवं जीवन, नवी सुरुवात आहे असं वाटतंय” असंही त्या म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वीच नुसरत जहाँ यांनी एक फोटो शेअर केला होता. यावेळी पिक्चर कर्टसीमध्ये त्यांनी ‘डॅडी’ असं लिहत हा फोटो त्यांच्या बाळाच्या वडिलांनी काढल्याचं म्हंटंलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *