मुलाच्या जन्मानंतर शिल्पा शेट्टीला जडला होता हा आजार, स्वतः केला धक्कादायक खुलासा.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने 15 फेब्रुवारी 2020 रोजी सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीला जन्म दिला आहे. यावर ती म्हणाली की, घरात दोन मुले हे यावेत असं मला नेहमी वाटतं होते. शिल्पा हिला एक मोठा मुलगा असून त्याचे नाव वियान असे आहे.

शिल्पा शेट्टी हिने नुकतीच मुलाखत दिली असून यामध्ये अनेक गंभीर बाबींचा खुलासा केला आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिने काय काय भोगले आहे हे देखील सांगितले आहे.शिल्पा शेट्टी हिने अभिनेता गोविंदा सोबतच आग या चित्रपटातून पदार्पण केले होते.या चित्रपटात सोनाली बेंद्रेची भूमिका होती.

मात्र, सोनाली बेंद्रे या चित्रपटात भाव खाऊन गेली होती. खऱ्या अर्थाने शिल्पा शेट्टी हिला अब्बास-मस्तान यांच्या बाजीगर या चित्रपटातून ओळख मिळाली होती. या चित्रपटातील भूमिका छोटेखानी होती. असे असले तरी तिने भाव खाल्ला होता. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले. अक्षय कुमार सोबत तिचे अनेक चित्रपट हिट झाले होते. मै खिलाडी तु आनाडी या चित्रपटातील चुराके दिल मेरा, हे गाणे प्रचंड गाजले होते. त्यानंतर अक्षय कुमार सोबत तिने काही चित्रपट केले.

अक्षय कुमार सोबत तिचा धडकन चित्रपट प्रचंड चालला होता. या चित्रपटानंतर अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्यातील प्रेम संबंध संपुष्टात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर अक्षय कुमार याने ट्विंकल खन्ना या सोबत लग्न केले. तर शिल्पा शेट्टी हिने राज कुंद्रा सोबत लग्न केले.

शिल्पा शेट्टी ही एक योगा अभ्यासक म्हणून देखील ओळखली जाते. तिचे योगाचे धडे देश-विदेशात गाजले आहेत. योगाच्या तिने अनेक सीडी देखील तयार केले आहेत. योगगुरु बाबा रामदेव यांच्या सोबतीने योगासने करून तिने धमाल उडवून दिली होती. बॉलिवूडमध्ये अशी एकमेव अभिनेत्री आहे की वयाची चाळिशी पार केल्यानंतरही अजूनही एकदम तरुण आणि विशीतील दिसते.

तिच्याकडे अनेकजण योगाचे धडे घ्यायला देखील येत असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसापूर्वी तिने एक मुलाखत दिली आहे. या वेळी तिने सांगितले की, मला वीयान पहिला मुलगा झाला. त्यानंतर भावाला बहीण असावी, असे मला वाटत होते. मी अनेकदा यासाठी राज यांच्याकडे हट्ट धरला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *