मौनी रॉय ने फार कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली आहे. मुख्यतः नागीन ह्या मालिकेत अभिनय करून तिने सगळयांचे लक्ष वेधले आहे. त्यानंतर तिने अनेक मालिकेत काम केले व आपला पाय इंडस्ट्रीत रोवला. सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असणारी मौनी कायमच मीडियामध्ये तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चित असते.
सध्या तिचा ताजा बोल्ड लुक लोकांना पसंत पडला आहे. ते फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. मौनी रॉयने तिचे नवीन बोल्ड फोटो नुकतेच इंस्टाग्रामवर पोस्ट केलेत. ह्यात ती अत्यंत मनमोहक रुपात दिसून आली आहे. काळ्या रंगाच्या टू पीस सोबत नेट अप्पर मध्ये मौनी नजरेत आली आहे. तिच्या ह्या फोटोजवर तिच्या फॅन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
ह्या फोटोज मध्ये मौनी फारच हॉट दिसत आहे असे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. मौनी रॉय नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजाने आपल्या फॅन्स ला घायाळ करते. ती तिच्या हॉट लुकसाठी संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीत ओळखली जाते. मौनी सोशल मीडियावर कधी ट्रॅडिशनल लुक , कधी ग्लॅमरस तर कधी असे बोल्ड लुक वाले फोटो पोस्ट करत असते त्यामुळे ती नेहमीच मिडियाच्या चर्चेत असते.
सोशल मीडियावर मौनी फारच लोकप्रिय आहे. तिचे सध्या इंस्टाग्रामवर १५ मिलियनहुन अधिक फॉलोवर आहेत. सोशल मीडियावर ती नेहमीच ऍक्टिव्ह असफे आणि तिचे फॅन्स तिच्या प्रत्येक अदाचे दिवाने आहेत.