बॉलिवुड अभिनेत्री नेहा शर्माला हल्लीच मुंबईमध्ये बघितले गेले. यादरम्यान नेहा शर्मा आपल्या खास मित्रांसोबत बाहेर फिरण्यासाठी देखील निघाली होती. नेहाला या दरम्यान माध्यमांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आणि आता तिचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नेहा आपल्या मित्रासोबत हातात हात घेऊन हॉटेल मधून बाहेर येनाता दिसते. यानंतर अभिनेत्री क्षणभरासाठी छायाचित्रकारांना पोज देते आणि मग आपल्या मित्रासोबत गाडीत बसून चालल्या जाते. नेहा शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.
नेहा शर्माच्या लुकचे सोशल मीडियावर खूपच चर्चे होत आहेत. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, नेहाने काळया रंगाची ब्रालेट ट्युब घातली होती. याच बरोबर अभिनेत्रीने आपल्या लुकला डेनिम जीन्स सोबत पूर्ण केले होते. चष्मा लावलेली नेहा खूपच टशन मध्ये दिसली.
नेहा शर्मा तर सोशल मीडियावर जास्तीत जास्त आपल्या लुकमुळेच चर्चेत असते. चित्रपटांपेक्षा जास्त नेहाचे हॉट हॉट फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि इंटरनेटचा पारा वाढवतात. नेहा शर्मा सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असते आणि नेहमी आपले फोटोज व व्हिडिओज चाहत्यांसाठी शेयर करत असते.