मालायकाने केला मोठा धक्कादायक खुलासा, अरबाज सोबत यामुळे घेतलाय घटस्फोट

मलायका अरोराचे नाव अद्याप बॉलिवूडच्या टॉप आणि हॉट अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. जरी आता तिला चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून पाहिले जात नसले, पण आजकाल ती अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल चर्चेत आहे. आजही तिच्या फिटनेस आणि सौंदर्यचे लाखो चाहते आहेत. टीव्हीच्या बर्‍याच रियलिटी शोमध्ये, आजही तिची शैली आणि हॉट स्टाईलमुळे ती जज म्हणून दिसते. तसेच, ती बर्‍याच मोठ्या कार्यक्रमांमध्ये देखील स्पॉट झालेली आहे.

आपल्या सर्वांना माहितच आहे की मलायकाचा सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत प्रेम विवाहात झाला होता. परंतु काही मतभेदांमुळे दोघांनीही सुमारे 18 वर्षांनंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचे ठरविले. जवळजवळ प्रत्येकजण त्याच्या निर्णयामुळे आश्चर्यचकित झाला होता. सुरुवातीलाच बातमी अशी आली होती की मलायकानेही अरबाजला लग्नासाठी प्रपोज केले होते. 2017 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.

जेव्हापासून त्यांचा घटस्फोट झाला आहे, तेव्हापासून माध्यमांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. जरी अरबाज खान आणि मलायका अरोरा या दोघांनीही माध्यमात कधी विधान केले नसले. अशा परिस्थितीत, प्रत्येकजण त्यांच्या नात्यात काय घडले याबद्दल त्यांचे स्वतःचे अंदाज बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. मलायकाने यामागे काहीच खात्रीशीर कारण दिले नसेल, परंतु ती ती म्हणाली होती की आपण जर एखाद्यापासून आनंदी नसाल तर त्यापासून दूर जाणेच कधीही बरे.

करीना कपूरच्या रेडिओ चॅट शोची गोष्ट आहे आणि येथे तिने घटस्फोट घेताना तिच्या कुटुंबातील सदस्यांनी काय सांगितले ते सांगितले. मलायकाने सांगितले की सर्वजण पहिल्या वेळी हेच म्हणत होते, की हे सर्व करु नको. यानंतर ती म्हणाली की हे तर सत्य आहेच, की असा निर्णय घेण्यासाठी कोणीही थेट हो म्हणणार नाही. प्रत्येकजण सांगेल की जे काही करत आहे ते जाणीवपूर्वक कर आणि मीसुद्धा अशा परिस्थितीतून गेलेलो आहे.

यानंतर मलायका पुढे म्हणाली की जेव्हा तिच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना कळले की ती आपल्या निर्णयावर ठाम आहे, तेव्हा तिला सर्वांनी पाठिंबा दिला. प्रत्येक जण शेवटी हेच म्हणत होता आम्हा तुह्या या निर्णयाचा अभिमान आहे. प्रत्येकाने माझे वर्णन एक सशक्त स्त्री म्हणून केले. ती पुढे म्हणाली की जेव्हा मला कुटूंबियाकडून ऐकायला मिळलेबतेव्हा मला अधिक धैर्य आले आणि मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले आणि माझा निर्णय घेतलाच.

आजही मलायका आणि अरबाज एका मित्राप्रमाणे एकमेकांना भेटतात. आजही त्यांच्यात रुसवाफुगवा दिसत नाही. आणि जो माणूस त्यांना पहिल्यांदा त्यांना पाहतो तो कधीच म्हणू शकत नाही यांचा घटस्फोट झाला आहे. मुलगा अरहानला भेटण्यासाठी अरबाजही अनेकदा मलायकाच्या घरी भेट देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *