मॉडेल सोफी चौधरी आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघीही एकत्र डान्स करत आहेत. त्यांच्या डान्स मूव्ह्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. वास्तविक, नुकताच सोफी चौधरीचा ‘गोरी है’ हा नवा म्युझिक अल्बम रिलीज झाला आहे. मलायका अरोरा आणि सोफी चौधरी या गाण्यावर एकत्र परफॉर्म करताना दिसत आहेत. ही व्हिडिओ क्लिप तीने तीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या गाण्यावर आतापर्यंत 2 मिलियनहून अधिक लोक आले आहेत. व्हिडिओमध्ये मलायका अरोरा पांढऱ्या क्रॉप टॉप आणि ब्लू डेनिममध्ये दिसत आहे. त्याचवेळी, सोफी चौधरीने ऑरेंज कलरचा ऑफ-शोल्डर क्रॉप टॉप घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉ’ट दिसत आहे. दोन्ही अभिनेत्रींनी हातात बांगड्या घातल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामुळे चाहते वेडे झाले आहेत. अभिनेत्री या गाण्याचे हुक स्टेप एकत्र करत आहेत.
अमृता अरोरानेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. सोफीचा हा म्युझिक व्हिडिओ ‘गोरी है कलाईयां’ या जुन्या गाण्याचे रिमेक व्हर्जन आहे. हे गाणे जया प्रदा आणि अमिताभ बच्चन यांच्यावर काही वर्षांपूर्वी चित्रित करण्यात आले होते. सोफी चौधरी अनेकदा जुनी गाणी रिमिक्स करत असते. मुलाखतीत तिच्याशी बोलले असता तिने प्रतिक्रिया देताना सांगितले की, जुन्या गाण्यांमध्ये खूप भावना असतात, त्यामुळे ती जुनी गाणी रिमिक्स करते.
मलायका अरोरा आणि सोफी चौधरीचा ‘गोरी है कलैयान’वर सुपर हॉ’ट डान्स, व्हिडिओ व्हायरल…..
