माजी पतीसोबत खोलीत कोंडल्याच्या प्रश्नावर सामंथा प्रभूने दिल असं उत्तर, चाहत्यांना बसला धक्काच….

सध्या कॉफी विथ करण हा शो खूप गाजत आहे. या शोमध्ये सेलिब्रिटींनी असे खुलासे केले आहेत की ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी त्यांच्या मैत्रीसाठी आणि बरेच काही केल्या. आणि दक्षिणेतील अभिनेत्री समंथा प्रभू आणि अक्षय कुमार या शोचे पाहुणे होते.

शो दरम्यान करणने समंथा आणि अक्षयला अनेक प्रश्न विचारले आणि खूप मजा केली. पण त्याने सामंथाला तिच्या घ’ट’स्फो’टाबद्दल प्रश्नही विचारले, ज्याला अभिनेत्रीने खुलेपणाने उत्तर दिले. ज्यावर तीचे उत्तर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांचे 2017 मध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न झाले होते. ही जोडी साऊथ इंडस्ट्रीतील सर्वोत्तम जोडींपैकी एक होती. त्यांच्या घ’ट’स्फो’टाची बातमी ऐकून केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीलाही धक्का बसला. 2021 मध्ये या दोन्ही जोडप्यांचा घ’ट’स्फो’ट झाला.

घ’ट’स्फो’टानंतर पतीसोबतच्या नात्याच्या प्रश्नावर सामंथा रुथ प्रभूने अतिशय धक्कादायक उत्तर दिले आहे. आम्हा दोघांना एका खोलीत बंद केले तर तुम्हाला चाकू किंवा धारदार वस्तू लपवावी लागेल, असे तीने सांगितले. कारण दोघांना एका खोलीत कोंडले तर ते एकमेकांना सहन करू शकणार नाहीत आणि भांडण करायला उतरतील. समंथा म्हणाली की तिचे तिच्या माजी पतीसोबतचे नाते चांगले नाही पण भविष्यात कदाचित गोष्टी चांगल्या होतील. समंथा प्रभूच्या बोलण्यातून स्पष्ट होते की, ती अजूनही या नात्यातील वेदना सहन करू शकलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *