Ormax Stars India Loves ने आपल्या एका अहवालात सर्वाधिक प्रिय आणि लोकप्रिय अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. ताज्या अहवालानुसार केवळ तीन बॉलीवूड अभिनेत्री लोकप्रियतेच्या शीर्ष 10 नायिकांच्या शर्यतीत आहेत, तर उर्वरित सात स्थाने दक्षिणेकडील सुंदरींनी व्यापलेली आहेत. या यादीत पुष्पाच्या ओ अंटावा गाण्यावर डान्स करणारी समंथा रुथ प्रभू पहिल्या क्रमांकावर आहे.
या टॉप 10 यादीत बॉलिवूडमधील आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांचा समावेश आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या मे महिन्याच्या टॉप 10 सर्वेक्षण अहवालात आलिया भट्ट समंथा नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे तीच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेले यश. या यादीत दीपिका पदुकोण सहाव्या तर कतरिना कैफ सातव्या क्रमांकावर आहे. अलिकडच्या काळात तिकीट खडकीसोबतच ओटीटीनेही प्रेक्षकांच्या पसंतीवर प्रभाव टाकला असून दक्षिणेतील अनेक चित्रपट आता हिंदीत डब करून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत.
टॉप 10 मध्ये दक्षिणेतील सौंदर्यवतींमध्ये तिसऱ्या क्रमांकावर नयनतारा, चौथ्या क्रमांकावर काजल अग्रवाल, पाचव्या क्रमांकावर रश्मिका मंदान्ना, आठव्या क्रमांकावर अनुष्का शेट्टी, नवव्या क्रमांकावर कीर्ती सुरेश आणि दहाव्या क्रमांकावर पूजा हेगडे आहेत. विशेष म्हणजे आता निर्माते दाक्षिणात्य या सुंदर चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये साईन करत आहेत. बॉलिवूडचे मोठे हिरोही या लोकप्रिय नायिकांसोबत काम करण्यास उत्सुक आहेत. तसंच या जवळपास सर्वच नायिका हिंदी प्रेक्षकांच्या ओळखीचे चेहरे आहेत.
लोकप्रियतेच्या शर्यतीत साऊथच्या या अभिनेत्रीने बॉलीवूडच्या सौंदर्यवतींना सोडले मागे, घ्या जाणून….
