रणबीर कपूर ची आई नीतू कपूर कार्यक्रम डांन्स दिवाणे ज्युनिअर मध्ये जज म्हणून दिसत आहे. ती या कार्यक्रमात खूपच मस्ती करताना दिसत आहे. कार्यक्रमाच्या होस्ट दरम्यान नीतूने 2-3 दिवसासाठी रणबीर आणि आलिया भट्टच्या लग्नासाठी ब्रेक घेतला होता. आता नीतू पुन्हा आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाली आहे.
नीतू कपूरला बुधवारी म्हणजेच काल बघितले गेले. नीतू नेहमी सारखीच मीडिया समोर खूप सुंदरतेने बोलताना दिसली. या दरम्यान नीतू ने हिरव्या रंगाचा सूट घातला होता ज्यामधे ती खूपच सुंदर दिसत होती. मग यादरम्यान मीडियाने नीतूला विचारले की, सून कशी आहे?
यावर उत्तर देताना नीतू म्हणाली की, सून…सून तर खूप चांगली आहे. या दरम्यान नीतूचे हावभाव खूपच कमालीचे होते. छायाचित्रकार देखील नीतूचे बोलणे ऐकून हसू लागले. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सर्वजण नीतूचे कौतुक करत आहेत. कोणी टिप्पणी करत आहे की, तुम्ही कुल सासू आहात. तर कोणी करत आहे की, तुम्ही किती प्रेमळ आहात.
रणबीर आणि आलियाच्या लग्नाअगोदर नीतू एका मुलाखती दरम्यान म्हणाली होती की तिला असे वाटते की आलिया सोबत तीचे नाते असे होवो की जसे त्यांचे नाते आपल्या सासू सोबत होते. नीतू म्हणाली होती की, माझे व माझ्या सासूचे नाते हे मैत्रिणी सारखे होते. आम्ही दोघी एकमेकांसोबत अनेक गोष्टी शेयर करत होतो. मला असे वाटते की माझे आणि आलियाचे नाते देखील असेच असावे.