लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कतरिना-विक्कीने एकमेकांना दिली ही खास भेट….

कतरिना कैफ आणि विकी कौशलची जोडी बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप पसंत केली जाते. बॉलीवूडच्या या पॉवर कपलने 9 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने दोघांच्या चाहत्यांनी आणि अनेक बॉलिवूड स्टार्सनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

दोघांनी 9 डिसेंबर 2021 रोजी लग्न केले होते. त्यावेळी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात दोघांनी लग्न केले. त्यांचा विवाह अत्यंत शाही पद्धतीने पार पडला. विकी आणि कतरिनाने त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त काहीतरी नवीन केले आहे. रिपोर्टनुसार, दोघांनी एकमेकांना खूप मौल्यवान भेटवस्तू दिल्याचे सांगण्यात येत आहे.

कतरिना आणि विकी कौशलच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, विकीने त्याची पत्नी कतरिनाला एक दागिन्यांचा तुकडा भेट दिला आहे जो खूप महाग आहे. तर दुसरीकडे कतरिनाने विकी कौशलला कार गिफ्ट केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार, असे सांगितले जात आहे की कतरिना आणि विकी कौशल दरवर्षी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गुंतवणूक करतील.

आता या दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफ नुकतीच ‘फोन भूत’ या चित्रपटात दिसली. मात्र, लोकांना तीचा चित्रपट फारसा आवडला नाही आणि त्यामुळेच ती बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर कतरिना लवकरच ‘टायगर ३’ या चित्रपटात सलमान खानसोबत दिसणार आहे. दुसरीकडे, विकी आगामी ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 16 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी दिसणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *