प्रत्येक नात्याचा किंवा लग्नाचा शेवट सुखद असेलच असं नाही. कलाविश्वात अनेक कलाकारांना घ ट स्फो टा चं दु:ख पचवावं लागलं आणि आता ते एकटेच आयुष्याचा आनंद घेत आहेत. जोडीदारासोबत विभक्त झाल्यानंतर एकटेच राहणारे मराठी कलाकार कोण आहेत ते पाहुयात..
सई ताम्हणकर– सईने 15 डिसेंबर 2013 रोजी निर्माता अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. 3 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र 2016 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सई सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत असून नुकतंच तिने स्वत:चा साड्यांचा व्यवसाय सुरु केला आहे.
स्मिता गोंदकर– ‘पप्पी दे पारुला’ फेम अभिनेत्री व बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक स्मिता गोंदकर हिने व्यावसायिक सिद्धार्थ बांडियाशी लग्न केलं होतं. या लग्नसोहळ्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. स्मिताने फसवणूक आणि छळाचे आरोप करत त्याला घ ट स्फो ट दिला. स्मिता सध्या नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असून कुटुंबीयांसोबत बराच वेळ घालवतेय.
उषा नाडकर्णी- काही वर्षांपूर्वीच पतीपासून विभक्त झाल्याचा खुलासा ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी बिग बॉस मराठीच्या घरात केला होता. एकट्याच राहत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
शाल्मली तोळ्ये- 2010 मध्ये शाल्मलीने पियुष रानडेशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांनंतर 2014 मध्ये दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. पियुषने अभिनेत्री मयुरी वाघशी दुसरं लग्न केलं. पण शाल्मली अजूनही एकटीच आहे.
तेजस्विनी पंडित- अभिनेत्री तेजस्विनीने बालमित्र भूषण बोपचेशी 2012 मध्ये लग्न केलं होतं. तेजस्विनी तिच्या घ ट स्फो टा विषयी कधीच व्यक्त झाली नाही. ती सध्या तिच्या कामावर व ‘तेजाज्ञा’ या फॅशन ब्रँडवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे.
तेजश्री प्रधान- अभिनेत्री तेजश्री प्रधान व शशांक केतकर यांच्या घ ट स्फो टा नंतर शशांकने दुसरं लग्न केलं. मात्र तेजस्वी अजूनही सिंगल आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील तिची शुभ्राची भूमिका सध्या चांगलीच गाजतेय.