बॉलिवुड मधील श्रद्धा कपूर चे लाखो चाहते आहेत. ती नेहमी सोशल मीडियावर आपले फोटोज आणि व्हिडिओज पोस्ट करत असते, जे चाहते खूप पसंत करत असतात. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. मागील दिवसात ही बातमी होती की श्रद्धा कपूरने आपल्या छायाचित्रकार प्रियकरासोबत चार वर्षांच्या नात्याला संपवले आहे.
सोशल मीडियावर आजकाल एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात श्रद्धा नवरीच्या रुपात सात फेरे घेत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर लाल जोड्यात खूपच सुंदर दिसत आहे. मात्र, काय खरंच श्रद्धा कपूरने लग्न केले आहे. काय आहे यामागचे खरे सत्य. खरंतर, श्रद्धा कपूरने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामधे ती नववधू सारखी सजलेली दिसत आहे.
मात्र, हा व्हिडिओ तिच्या लग्नाचा नाही आहे तर एका लग्नाच्या दागिन्याचा प्रचार करत आहे. म्हणून ती नवरी बनलेली दिसत आहे. व्हिडिओ शेयर करताना श्रद्धाने लिहिले आहे की, मला सोनं घालने खूप आवडतं. मात्र, काम , झाल्यानंतर मला याला कुळुपात बंद करून ठेवायला नाही आवडत. म्हणून मला त्या सर्व दागिण्यांबद्दल सांगायचे आहे, जे सर्वजण घालू शकतील.
श्रद्धा कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर श्रद्धा लवकरच चित्रपट ‘लव रंजन’ मध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त ती ‘चालबाज इन लंडन’ आणि नागीण सारख्या चित्रपटात देखील आपल्याला दिसली जाणार आहे. श्रद्धा कपूर सध्या तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे खूपच व्यस्त आहे. मात्र, तरी देखील वेळ काढून सोशल मीडियावरून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.