कुलकर्णी कुटुंब हे देशातील सर्वात उंची असलेलं कुटुंब आहे. स्वतःची लांबी 7 फुटांपेक्षा जास्त आहे, तर मुलगी….

जाहिरातींच्या या युगात खाण्यापिण्याशी संबंधित गोष्टीही जाहिरातीच्या आधारावर विकाल्या जाऊ लागल्या आहेत. मग त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? हे कोणालाच माहीत नाहीये. तरीही अनेक गोष्टी वापरल्या जात आहेत. आजच्या जगात अशा किती गोष्टी आपल्याला दिसतात ज्या मुलांची उंची वाढवण्याच्या नावाखाली विकली जात आहेत. दोन..तीन दशकांपूर्वी, बालपणात उंची वाढवण्यासाठी, लोक कधीकधी झाडावर लटकत असत, तर कधी ते बास्केटबॉल खेळायचे. हे सर्व करूनही लोकांची उंची वाढली नाही. या सगळ्यामागील कारण म्हणजे अनुवांशिक प्रक्रिया आहे.

तसेच भारतात असे एक कुटुंब आहे. ज्याने सर्वाधिक उंचीचा रेेकॉर्ड स्थापित केेला आहे. होय, पुण्याचे ‘कुलकर्णी कुटुंब’ ज्याला भारतातील सर्वात उंच असलेले कुटुंब देखील म्हटले जाते. कारण ‘कुलकर्णी कुटुंब’ च्या प्रत्येक सदस्याची उंची सुमारे 6 फुटा पेक्षा अधिक आहे. भारतातील लोकांची सरासरी उंची साधारणपणे साडेपाच फुटांपर्यंत असते, पण पुण्याच्या ‘कुलकर्णी कुटुंबा’ची सरासरी उंची 6 फूटांपेक्षा जास्त आहे. या कुटुंबात चार सदस्य आहेत. पालक आणि त्यांच्या दोन मुलींची एकूण उंची 26 फूट आहे.

शरद कुलकर्णी हे पुण्यात राहणाऱ्या ‘कुलकर्णी कुटुंबा’चे प्रमुख आहेत. शरदची उंची 7 फूट 1.5 इंच आहे, तर त्याची पत्नी संजोत 6 फूट 2.6 इंच उंच आहे. शरद आणि संजोत यांनी भारतातील सर्वात उंच जोडपे असल्याचा रेेकॉर्ड स्थापित केेला आहे. त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. शरद आणि संजोत कुलकर्णी यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलीही उंचीने कमी नाहीत. मोठी मुलगी मुरुगा 6 फूट 1 इंच उंच आहे, तर छोटी मुलगी सान्या 6 फूट 4 इंच उंच आहे.

धाकटी मुलगी सान्याची उंची वयाच्या 16 व्या वर्षी 6.4 फूट झाली होती. तर वयाच्या 18 व्या वर्षी मुरुगाची उंची 6 फूट होती. या कुटुंबातील सदस्यांची लांबी इतकी आहे की हजारोच्या गर्दीतही ते वेगळे दिसतात. ‘कुलकर्णी कुटुंबाने आता त्यांच्या एकत्रित उंचीचा नवा विश्वविक्रम केला आहे. शरद (वडील), संजीत (आई), मृगा आणि सान्या (मुली) यांची एकत्रित उंची 26 फूट आहे. मात्र, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये सध्या वर्ल्डच्या सर्वात उंच कुटुंबाची श्रेणी नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *