बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनची धाकटी बहीण नुपूर सेनन आज तिचा २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. नूपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेननची बहीण आणि अभिनेत्री नुपूर सेनन आज तिचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. नूपूर लवकरच चित्रपटांमध्ये दिसणार आहे. नुपूर सेनॉनच्या बॉलिवूड डेब्यूकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
तीचा पहिला चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. सध्या ती तिच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. क्रितीची बहीण नुपूर सेनन पहिल्यांदा अक्षय कुमारसोबत एका गाण्यात दिसली होती. हे गाणं इतकं हिट झालं की दोघांनी पुन्हा एकदा गाण्याच्या दुसऱ्या भागात एकत्र काम केलं.
नूपूर तिची मोठी बहीण आणि अभिनेत्री क्रितीच्या खूप जवळ आहे. दोन्ही बहिणी अनेकदा सोशल मीडियावर एकत्र फोटो आणि रील्स बनवतात आणि शेअर करतात.
नुपूरलाही तिच्या बहिणीप्रमाणे मोठी अभिनेत्री व्हायचे आहे. अभिनयाव्यतिरिक्त तीला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडते. अभिनेत्री अनेकदा तिच्या व्हेकेशनचे फोटो शेअर करत असते.