बॉलिवूडमध्ये बरेच वेगवेगळे चित्रपट हे येत असतात, परंतु काही चित्रपट असे असतात की जे प्रेक्षकांना वर्षानुवर्षे आठवणीत राहतात. असाच एक चित्रपट 15 वर्षांपूर्वी आला होता. ज्यामध्ये असाच एक सुपरहीरो दिसला ज्याने पुढील 3 सिक्वेलपर्यंत पैसे मिळवले.
आतापर्यंत तुम्हाला समजले असेलच की आम्ही हृतिक रोशन आणि प्रीती झिंटाच्या 2003 मध्ये आलेल्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. हा चित्रपट भारतातील सुपरहिरो आणि विज्ञान कल्पित श्रेणीतील सर्वाधिक पसंतीच्या चित्रपटांपैकी एक आहे.
या चित्रपटात हृतिक रोशनने मानसिकरित्या दुर्बल मुलाची भूमिका केली होती, जी लोकांना चांगलीच आवडली होती. हृतिकला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता आणि फारच कमी कलाकार असे करू शकतात.
या चित्रपटाच्या गाण्यांपासून ते संवादांपर्यंत सर्व काही प्रसिद्ध झाले होते आणि मुलांना हृतिकचा मित्र जादू आवडला होता. पण त्या काळात ही भूमिका कोणी केली हे कोणालाही कळले नाही. खरं तर, लोक अभिनेता म्हणून नव्हे तर त्याला केवळ जादू म्हणून लोकांनी पहावे अशी राकेशची इच्छा होती. तसे, हे पात्र इंद्रवदन पुरोहित यांनी साकारले होते.
इंद्रवदन पुरोहित टीव्ही आणि चित्रपटांतील एक सुप्रसिद्ध चेहरा आहे, इंद्रवदन यांनी हिंदी-गुजराती-मराठीसह एकूण 30 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते अखेरला एसएबी टीव्हीवर मुलांचा शो ‘बलवीर’ मध्ये डूबा डुबा नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसले होते. तथापि, ते आता आपल्यामध्ये नाहीयेत, 28 सप्टेंबर 2014 रोजी त्यांनी जगाला निरोप दिला आहे.
कोई मिल गया हा राकेश रोशन दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटाने 48.1 करोडचा व्यवसाय केला होता. हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर, त्याचे आणखी दोन भाग क्रिश आणि क्रिश 3 आले होते आणि प्रेक्षकांना हे दोन्ही चित्रपट आवडले.
हृतिक रोशनने 8 ऑगस्ट 2003 रोजी रिलीज झालेल्या कोई मिल गयाची 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहिली होती. त्याने ट्विटरवर लिहिले की, ‘कोई मिल गया ने क्रिशला जन्म दिला आणि अनोख्या पद्धतीने रोहितची भूमिका साकारल्याने मला नवीन बळ मिळालं. रोहितने मला सर्वकाही समजण्यास मदत केली.