बॉलिवुड मधील रुजलेली अभिनेत्री आणि राजनेता यांचा 9 एप्रिल रोजी 74 वा वाढदिवस साजरा झाला. या विशेष दिवशी तीच्या कुटुंबातील लोकांव्यतिरिक्त सामान्य माणसांपासून ते खास माणसांपर्यंत सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. जया बच्चन यांच्या या खास दिवशी आम्ही तुम्हाला काही विशेष गोष्टी सांगणार आहोत.
एकदा शाहरुख खानने सलमान खानच्या एक्स प्रियसीचा उल्लेख केला होता. यामध्ये त्याने ऐश्वर्या रॉयचे देखील नाव घेतले होते. यावर जया बच्चन ने प्रतिक्रिया देताना म्हणाल्या होत्या की, “जर मी तिथे असते तर शाहरुख च्या कानाखाली मारली असती.”
तर एकदा जया बच्चन यांनी एका मुलाची शाळा घेतली होती. खरंतर, एका चाहत्याने तिच्या मोबाईल मधून फोटो घेण्याचा प्रयत्न केला होता. यावर जया बच्चन ने त्याला खूप ऐकवले होते. जया बच्चन त्याला म्हणाली होती की, “तू फोन मधून फोटो काढण्यासाठी माझ्याकडून परवानगी घेतलीस का?”
एकदा ऐश्वर्या रॉय बच्चन एका कार्यक्रमातून वापस येत होती आणि या दरम्यान मीडियाने तिला थांबवून तिचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा जया बच्चन यांनी त्यांना खूप ऐकवले होते. जया बच्चन म्हणाल्या होत्या की, “असे जंगली सारखे का करत आहात?” मग अभिषेक बच्चनने आपल्या आईला शांत केले.