बॉलिवुड अभिनेत्री कॅटरीना कैफने जेव्हापासून विकी कौशल सोबत लग्न केले आहे, तेव्हापासून ती चर्चेत आहे. कॅटरिना कैफ सध्या आपल्या कामात खूपच व्यस्त दिसत आहे. तिला नेहमी विमानतळावर जाता-येता बघितले जाते. जास्तीत जास्त वेस्टर्न कपड्यात आणि स्टाईल मध्ये राहणारी कॅटरीना कैफ जेव्हा यावेळेस विमानतळावर बघितली गेली, तर लोकांनी ती गर्भवती असल्याचा अंदाज लावायला सुरुवात केली.
खरंतर, यावेळेस जेव्हा कॅटरीनाला विमानतळावर बघितले गेले तेव्हा ती एका सैल गुलाबी रंगाच्या सुट मध्ये दिसली गेली. तथापि, या लुकमध्ये कॅटरीना नेहमी सारखीच सुंदर दिसत होती. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मध्ये हलक्या गुलाबी रंगाचा कुर्ता, प्रिंटेड फ्लोरल प्लाजो आणि प्रिंटेड फ्लोरल ओढणी मध्ये बघितले जाऊ शकते.
कॅटरीनाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी तिच्या गर्भवतीपणाबद्दल अंदाज लावायला सुरुवात केली. एका सोशल मीडिया वापरकर्त्यांने या व्हिडिओवर टिप्पणी देत लिहिले की, “कॅटरीना गर्भवती आहे काय?” तर तसेच दुसऱ्या वापरकर्त्यांने लिहिले की, “सोपं अन् साधं. दीपिकाने कॅटरीना कडून शिकले पाहिजे.” तसेच काहीजण असे देखील म्हणताना बघितले गेले की, कॅटरीना ने काही जरी घातलं तरी तिला ते शोभेल.
लक्ष देण्यासारखे हे आहे की, काही महिन्यांपूर्वीच विकी कौशल आणि कॅटरीना कैफ यांचे लग्न झाले आहे. लग्नानंतर अभिनेत्री कधी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल तर कधी आपल्या व्यावसायिक आयुष्याबद्दल लाइमलाइट मध्ये आहे. लवकरच कॅटरीना सलमान खानसोबत ‘टायगर 3’ मध्ये दिसली जाईल. ज्याच्या चित्रीकरणासाठी ती हल्लीच तुर्की मध्ये उपस्थित होती.