इंदूरमधील हॉटेलच्या खोलीतून कटरिनाचे असे फोटो झाले व्हायरल, चाहते झाले थक्क!!

बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री कटरिना कैफ एका आठवड्याहून अधिक काळ मध्य प्रदेशातील इंदूर शहरात आहे. येथे कटरिनाचा पती आणि अभिनेता विकी कौशल अभिनेत्री सारा अली खानसोबत त्याच्या ‘लुका छुपी 2’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. विकीसाठी कटरिना शुक्रवारी इंदूरला आली होती.

कटरिना कैफ एका आठवड्याहून अधिक काळ इंदूरमधील हॉटेलमध्ये थांबली आहे. कटरिना शुक्रवारी रात्री (8 जानेवारी) मुंबईहून विमानाने इंदूरला पोहोचली. यानंतर, दुसऱ्याच दिवशी या जोडप्याने इंदूरमध्ये लग्नाचा एक महिना एकत्र साजरा केला आणि कतरिनाने विकीला मिठी मारतानाचा एक फोटो पोस्ट केला.

अलीकडेच कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनीही इंदूरमध्ये एकत्र लोहरी सण साजरा केला. लग्नानंतर दोघांची ही पहिलीच लोहरी होती. विकीने कतरिनासोबतचे त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघे मिळून लोहरी साजरी करत होते.

इंदूरमध्ये लग्नाचा महिना आणि लोहरी एकत्र साजरी केल्यानंतर आता कतरिना कैफने रविवारचा सेल्फी शेअर केला आहे. रविवारी अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले. अभिनेत्रीचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

कतरिना कैफ लग्नाआधीच ब्रेकवर आहे. विकी लग्नानंतर आपल्या कामावर परतला आहे, तर कतरिना सध्या इंदूरमध्ये विकीसोबत चांगला वेळ घालवत आहे. कतरिना मोकळी होती, त्यामुळे ती इंदूरला आली होती आणि तिला इंदूर खूप आवडते. हे तीच्या पोस्टच्या कॅप्शनवरूनही स्पष्टपणे समजू शकते.

लाल शर्ट परिधान केलेल्या कतरिनाने इंदूरमधील हॉटेलमधील तिच्या खोलीतील हे फोटो शेअर केले आहेत. तिने आपले केस खुले ठेवले आहेत आणि ती वेगवेगळ्या पोझ देत आहे. तीने इंस्टाग्रामवरून एकूण चार फोटो शेअर केले आहेत. यासोबत तीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “Indoors in Indore #sundayselfie”. फोटोंमध्ये कतरिना नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.

कतरिनाने रविवारी दुपारी हे फोटो पोस्ट केले. या फोटोंना 22 लाख 32 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कतरिनाच्या सौंदर्याशिवाय चाहत्यांच्या नजराही दुसऱ्या ठिकाणी गेल्या. वास्तविक, चित्रांमध्ये अभिनेत्रीने खाली काहीही घातलेले दिसत नाही.कतरिनाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. लाइक्ससोबतच अनेक कमेंट्सही येत आहेत. अभिनेत्री नेहा धुपियाने यावर टिप्पणी करताना लिहिले की, “छान” कॅप्शन. तर अभिनेत्रीच्या एका चाहत्याने लिहिले की, “तिसर्‍या फोटोत तु विकीला पाहत आहेस”. त्याच वेळी, आणखी एका चाहत्याने लिहिले की, “तुर्कीबद्दल खूप प्रेम..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *