कश्मिरा शाह हे बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये कश्मिराचे नाव यायचे. तिने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज कश्मिरा पडद्यावर कमी दिसत असेल, पण प्रसिद्धी कशी मिळवायची आणि ती कशी टिकवायची हे तिला चांगलंच माहीत आहे.
कश्मिराचा जन्म 2 डिसेंबर 1971 मध्ये झाला. कश्मिराचा जन्म मुंबईत झाला असून ती प्रसिद्ध गायिका अंजनीबाई लोळेकर यांची नात आहे. कश्मिराने हिंदी टीव्ही शो, मराठी चित्रपट आणि काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. बिग बॉस या प्रसिद्ध रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनमध्ये ती सहभागी झाली आहे. याशिवाय ती नच बलिए आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 4 सारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. कश्मिरा 51 वर्षांची आहे पण तरीही तिने बो’ल्ड’नेसमध्ये अनेक तरुण अभिनेत्रींना मागे टाकले आहे.
कश्मिराने कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेकसोबत लग्न केले आहे. कश्मिरा तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठीही ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आणि ती अनेकदा तिचे बो’ल्ड फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. काश्मिरीच्या चाहत्यांना तिचे फोटो खूप आवडतात आणि कमेंट्समध्ये तिची प्रशंसा केली जाते.
कश्मिराचा नवरा कृष्णा बद्दल बोलायचे तर तो एक कॉमेडियन आहे आणि तो कपिल शर्माच्या कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये कॉमेडी करताना दिसत आहे. याशिवाय तो ‘बोल बच्चन’ चित्रपटातील कामासाठी ओळखला जातो. कृष्णाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा 4’ मध्ये तो सहभागी झाला आहे.
सध्या कश्मिरा तिचा पती कृष्णासोबत बिग बॉसच्या चर्चेत आहे. यामध्ये ते दोघेही बाहेर काढलेल्या स्पर्धकांसोबत घराविषयी काही प्रश्नोत्तरे करतात आणि त्यांच्या दर्शकांसाठी काही मसालेदार माहिती मिळवतात.